चंद्रपूर :- आपत्कालीन परिस्थितीत एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचविण्यासाठी योग्य वेळी योग्य कृती करणे अत्यंत महत्त्वाचे असते. जीवनरक्षणाचे कौशल्य आत्मसात केल्यास संकटाच्या प्रसंगी अनेकांचे प्राण वाचवता येऊ शकतात. याच उद्देशाने सेंट जॉन ॲम्ब्युलन्स इंटरनॅशनल असोसिएशनच्या वतीने भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगरच्या सहकार्याने विद्यार्थांसाठी आयोजित जीवनरक्षण प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रम रविवारी गांधी चौक येथील भाजप महानगर कार्यालयात उत्साहात संपन्न झाला. Life-saving training and public awareness initiative led by MLA Kishor Jorgewar
मन की बात च्या 12 वर्षपूर्ती निमित्त चंद्रपुरात भव्य कार्यक्रम
यावेळी आमदार किशोर जोरगेवार, भारतीय जनता पार्टीचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, राज्य कार्यकारणी परिषद सदस्य तुषार सोम, जेष्ठ नेते प्रकाश देवतळे, महामंत्री शाम कनकम, युवा मोर्चा उपाध्यक्ष उपाध्यक्ष रघुवीर अहिर, मंडळ अध्यक्ष प्रदीप किरमे, नगरसेविका सविता कांबळे, जेष्ठ नेते पूनम तिवारी, सुरेश तालेवार, प्रमोद शास्त्रकार, अध्यक्ष विद्यार्थी आघाडी प्रलय म्हशाखेत्री, महानगर एस.आय.आर. प्रमुख सुमित बेले, प्रिन्स प्रसाद, रंजन ठाकूर, राकेश बोमनवार, छाया चवरे, रीना साखरकर, मनीषा पडगेलवार आदिंची उपस्थिती होती.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमात चंद्रपूरच्या मास्टर ट्रेनर लीना पिपरोदे यांनी जीवनरक्षणासंदर्भात मार्गदर्शन केले. सुरक्षित समाज, सजग नागरिक आणि जीवनरक्षण ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून नागरिकांमध्ये आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
अपघात, अचानक उद्भवणारी वैद्यकीय समस्या किंवा इतर आपत्कालीन प्रसंगी रुग्णाला वेळेत मदत मिळणे अत्यंत गरजेचे असते. अशा वेळी उपस्थित व्यक्तीने घाबरून न जाता परिस्थितीनुसार योग्य पावले उचलणे महत्त्वाचे ठरते. जीवनरक्षणाच्या प्राथमिक ज्ञानामुळे रुग्णाला वैद्यकीय मदत मिळेपर्यंत आवश्यक ती मदत करता येऊ शकते. या दृष्टीने जीवनरक्षण प्रशिक्षणाचे महत्त्व यावेळी प्रात्याक्षिकाद्वारे सांगण्यात आले.
जीवनरक्षण हे केवळ आरोग्य क्षेत्रातील व्यक्तींचे कौशल्य नसून प्रत्येक सजग नागरिकाला त्याची माहिती असणे आवश्यक आहे. समाजातील अधिकाधिक नागरिकांनी असे प्रशिक्षण घेऊन आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी पुढाकार घ्यावा, तसेच सुरक्षित आणि संवेदनशील समाजनिर्मितीस हातभार लावावा, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
सेंट जॉन ॲम्ब्युलन्स इंटरनॅशनल असोसिएशन आणि भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगर यांच्या सहकार्याने पार पडलेल्या या उपक्रमातून जीवनरक्षणाविषयी जनजागृती करण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न करण्यात आला.
आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी बोलताना, आपत्कालीन परिस्थितीत एखाद्याचा जीव वाचविणे हे सर्वात मोठे मानवतावादी कार्य आहे. अपघात किंवा अचानक उद्भवलेल्या वैद्यकीय संकटाच्या वेळी योग्य वेळी मिळालेली मदत एखाद्याला नवजीवन देऊ शकते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला जीवनरक्षणाचे प्राथमिक प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात जागरूकता वाढण्यासोबतच संकटाच्या वेळी एकमेकांच्या मदतीला धावून जाण्याची भावना बळकट होते. सुरक्षित आणि सजग समाजनिर्मितीसाठी अशा जनजागृतीपर उपक्रमांना आपण प्राधान्य दिले पाहिजे,” असे मत व्यक्त केले.
