Sunday, September 27, 2026
HomeEducationalइन्फंट जीजसच्या १० विद्यार्थ्यांची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

इन्फंट जीजसच्या १० विद्यार्थ्यांची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

चंद्रपूर :- क्रीडा संकुल, विसापूर (ता. बल्लारपूर) येथे नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत इन्फंट जीजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल, राजुराच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत विविध वजनी गटांत प्रथम क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर १० विद्यार्थ्यांची भंडारा येथे होणाऱ्या विभागीय स्तरावरील कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. Students of Infant Jesus selected for the divisional wrestling competition

यामध्ये १४ वर्षांखालील मुलींच्या गटात माही आशिष चुंबळे (३० किलो), अनन्या इंद्रावन साखरकर (४५ किलो), आरोही विजय मसे (५९ किलो), क्रिस्टीना अक्षद मेश्राम (४६ किलो), तारण्या प्रताप लाकडे (३३ किलो) आणि आस्था मनोज तेलीवार (३५ किलो) यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

तर १७ वर्षांखालील मुलींच्या गटात निहारिका शारदा भलमे (५० किलो), हर्षदा मनोज डाहुले (६५ किलो) आणि लावण्या गौतम सूर्यवंशी (४४ किलो) यांनी अव्वल स्थान मिळविले. तसेच १७ वर्षांखालील मुलांच्या गटात आयुष गजानन येरणे (५८ किलो) याने प्रथम क्रमांक पटकावला.

विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक पुंडलिक वाघमारे, हर्षल क्षीरसागर व रोहित शर्मा यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular