Sunday, September 13, 2026
HomeEducationalराजुरा, निमणी, गडचांदूर बससेवा पूर्ववत सुरू करा

राजुरा, निमणी, गडचांदूर बससेवा पूर्ववत सुरू करा

चंद्रपूर :- राजुरा–निमणी–गडचांदूर मार्गावरील बससेवा पूर्ववत सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी राजुरा आगार प्रमुख राकेश बोधे व वाहतूक निरीक्षक अंकित कामतकर यांना निवेदन देत तातडीने बसफेऱ्या सुरू करण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वेळेचा विचार करून सकाळी ६.३० वाजता आणि दुपारी १२.३० वाजता बससेवा उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. Resume the Rajura – Nimani – Gadchandur bus service

5 गुन्हे उघड, LCB ची कारवाई……

यावेळी निमणी येथील माजी अध्यक्ष संजय गांधी निराधार समिती कोरपना उमेश राजुरकर, रत्नाकर पिदुरकर, स्वप्नील धोटे, सरिता नगराळे, आशा टोंगे, शालू मोगरे, सुनीता चौधरी, मंगला चटकी, छबू दुरुटकर, महाविद्यालयीन विद्यार्थी आदी उपस्थित होते.

निमणी व परिसरातील अनेक विद्यार्थी दररोज शिक्षणासाठी राजुरा तसेच गडचांदूर येथे ये-जा करतात. मात्र या मार्गावरील बससेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांना खासगी ऑटोचा आधार घ्यावा लागत आहे. ऑटोने प्रवास करण्यासाठी विद्यार्थ्यांना सुमारे १०० रुपये खर्च करावे लागत असल्याने आर्थिक भार वाढला आहे.

दैनंदिन कामांसाठी राजुरा, गडचांदूर व परिसरातील बाजारपेठेत जाण्यासाठी बससेवा महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यां सोबत शेतकरी व महिलांचीही गैरसोय बससेवा सुरळीत नसल्यामुळे केवळ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर शेतकरी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिसरातील शेतकऱ्यांना भाजीपाला दूध व दही विक्रीसाठी बाजारपेठेत तसेच गावाबाहेरील ठिकाणी जाण्यासाठी वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. नियमित बस नसल्याने खासगी वाहन किंवा ऑटोचा वापर करावा लागत असून त्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागत असल्याने तात्काळ बस सेवा सुरू करा अशी मागणी विद्यार्थी, पालक, शेतकरी, महिला व नागरिकांकडून होत आहे.

राजुरा निमणी गडचांदुर सकाळी ६.३० ची बससेवा तात्काळ सुरू करत आहोत आणि दुपारी १२.३०ची बसफेरीही निश्चित वेळापत्रकानुसार सुरू करू….!

राकेश बोधे
राजुरा आगार प्रमुख

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular