Wednesday, September 9, 2026
HomeNationalराहुल गांधींवरील FIR विरोधात चंद्रपुरात काँग्रेसचा एल्गार

राहुल गांधींवरील FIR विरोधात चंद्रपुरात काँग्रेसचा एल्गार

चंद्रपूर :– लोकसभा विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते, जननायक खा. राहुल गांधी यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या कथित द्वेषपूर्ण एफआयआरच्या निषेधार्थ तसेच उत्तराखंडमधील भाजप कार्यकर्त्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याच्या मागणीसाठी चंद्रपूर शहरात काँग्रेसच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. Congress launches a spirited protest in Chandrapur against the FIR filed against Rahul Gandhi

चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे आणि शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष शिवा राव पोलशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.

आंदोलनाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला विनम्र अभिवादन करून करण्यात आली.

यावेळी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या एफआयआरचा तीव्र निषेध नोंदवत घोषणाबाजी केली. राजकीय विरोधकांविरुद्ध द्वेषभावनेतून कारवाई न करता लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्याची मागणी आंदोलकांनी केली.

तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उत्तराखंडमधील हल्दावाणी येथील सभेनंतर भाजप कार्यकर्त्यांकडून झालेल्या शुद्धीकरण प्रकाराची चौकशी करून संबंधितांवरही कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

सुभाषभाऊ धोटे यांनी यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना लोकशाही, संविधान आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यासाठी काँग्रेस सातत्याने संघर्ष करीत राहील, अशी भूमिका मांडली. राहुल गांधी यांच्यावरील कारवाई ही राजकीय सूडबुद्धीने प्रेरित असल्याचा आरोप करत त्यांनी निषेध व्यक्त केला.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष पराग पास्ते, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा कुंदाताई जेनेकर, शहर महिला जिल्हा अध्यक्ष चंदाताई वैरागडे, सुनंदाताई धोबे, किसान सेल जिल्हाध्यक्ष दिपक वाढई, प्रवीण पडवेकर, अंबिका प्रसाद दवे, गोपाल अमृतकर, प्राचार्य नरेंद्र बोबडे, चंद्रपूर ब्लाक अध्यक्ष अनिल नरुले, विद्या ठाकरे, संगीता भोयर, सुनीता गोवर्धन, रामकृष्ण कोंडरा, देवानंद लांडगे, संतोष कुर्रा, विशाल भारती, निस्सार शेख, यासह मोर्चात जिल्हा व शहर काँग्रेसचे पदाधिकारी, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, विविध सेलचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular