Sunday, September 6, 2026
HomeCrimeगणेशोत्सवातून समाजप्रबोधन - चंद्रपूर पोलीसांची विशेष स्पर्धा जाहीर

गणेशोत्सवातून समाजप्रबोधन – चंद्रपूर पोलीसांची विशेष स्पर्धा जाहीर

चंद्रपूर : गणेशोत्सव केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक प्रबोधनाचे प्रभावी माध्यम ठरावे, यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. Social awareness through Ganeshotsav

अमली पदार्थविरोधी जनजागृती, ध्वनी प्रदूषण नियंत्रण तसेच महिला सुरक्षा व सक्षमीकरण या सामाजिक विषयांवर उत्कृष्ट देखावे, जिवंत झांकी किंवा प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांसाठी विशेष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. Chandrapur Police announce special competition

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला 10 वर्षाचा सश्रम कारावास……..

उत्सवाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक संदेश पोहोचविण्यासोबतच तरुण पिढीला योग्य दिशा मिळावी, व्यसनमुक्त समाजाची निर्मिती व्हावी आणि सामाजिक बांधिलकी जोपासली जावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. LCB चा पहाटे सापळा… ओडिशातून आलेला गांजा जप्त……

तीन महत्त्वाच्या विषयांवर जनजागृती – 
अमली पदार्थविरोधी जनजागृती  व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम, अमली पदार्थांपासून दूर राहण्याचा संदेश तसेच निरोगी आणि व्यसनमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी प्रबोधन करणाऱ्या देखाव्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.

ध्वनी प्रदूषण नियंत्रण : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करत कर्णकर्कश डीजे व साऊंड सिस्टीमचा वापर टाळणे, पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन देणे आणि पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश देणाऱ्या मंडळांचेही मूल्यांकन केले जाणार आहे.

महिला सुरक्षा व सक्षमीकरण : महिलांवरील अत्याचाराला प्रतिबंध, छेडछाडविरोधी जनजागृती, सायबर सुरक्षितता तसेच महिलांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायद्यांची माहिती देणारे प्रभावी देखावे, पथनाट्य अथवा प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करणाऱ्या मंडळांचा स्पर्धेत समावेश केला जाणार आहे.

विजेत्यांवर रोख बक्षिसांची बरसात
स्पर्धेतील उत्कृष्ट गणेश मंडळांना आकर्षक रोख बक्षिसांनी गौरविण्यात येणार आहे.
प्रथम क्रमांक – ₹२१,०००
द्वितीय क्रमांक – ₹११,०००
तृतीय क्रमांक – ₹५,१००
याशिवाय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व गणेश मंडळांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

मंडळांनी सहभागी होण्याचे आवाहन
चंद्रपूर जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक जनजागृतीचा संदेश देण्याचे आवाहन चंद्रपूर जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.

नोंदणी व अधिक माहितीसाठी :
ई-मेल : spchandrapur123@gmail.com
व्हॉट्सॲप : 74477440100
गणेशोत्सवाचे पावित्र्य जपत ‘उत्सवातून प्रबोधन आणि प्रबोधनातून समाजहित’ साधण्याचा पोलिसांचा हा उपक्रम चंद्रपूरच्या गणेश मंडळांसाठी सामाजिक योगदानाची एक आगळी संधी ठरणार आहे.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular