Saturday, September 5, 2026
HomeEducationalप्रा. डॉ संजय गोरे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

प्रा. डॉ संजय गोरे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

चंद्रपूर :- गोंडवाना विद्यापीठाचे व्यवस्थापन व सिनेट सदस्य तथा गडचांदूर येथील शरदराव पवार महाविद्यालयाचे प्राध्यापक व व राज्यशास्त्र विभाग प्रमुख यांना महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा राज्यस्तरीय डॉ. जे.पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार 2025-26 हा पुरस्कार 5 सप्टेंबर रोजी पुणे येथे सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर सभागृहात महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते स्वपत्निक प्रदान करण्यात आला. Prof. Dr. Sanjay Gore honored with the Government of Maharashtra’s Dr. J.P. Naik State-Level Ideal Teacher Award

यावेळी राज्याचे शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी व इतर मान्यवर उपस्थित होते. रोख रक्कम, सन्मान चिन्ह , शासनाचे सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

डॉ.संजय गोरे हे 2012 पासून विद्यापीठाच्या सर्व प्राधिकरणावर कार्यरत असून त्यांची 10 पुस्तके व त्यांच्या मार्गदर्शनाखाली 11 विद्यार्थ्यांना पी. एचडी.पदवी प्राप्त झालेली आहे. त्यांचे विविध संशोधन पत्रिकेत 77 लेख प्रकाशित झाले असून त्यांचा 100 च्या वर राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभाग आहे. त्यांना या आधी गोंडवाना विद्यापीठाचा विद्यापीठस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार तथा राष्ट्रीय सेवा योजनेचा उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी पुरस्कार प्राप्त झाला आहे.

विद्यापीठाच्या सर्व समित्यांवर अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी कार्य केले असून गोंडवाना विद्यापीठाच्या मॉडेल कॉलेज आणि युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थांच्या गव्हर्नमेंट बॉडी वर कार्यरत आहे. सिनेट सदस्य म्हणून विद्यार्थी व शिक्षकांच्या प्रश्नासाठी सक्रिय भरीवपणे ते कार्य करीत आहेत.

डॉ संजय गोरे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular