चंद्रपूर :- एखादा उद्योग हा केवळ आपल्या उत्पादणावर लक्ष केंद्रित करीत नसून पर्यावरणाच्या रक्षणाकरिता “मियावाकी फॉरेस्ट” (घनवन उद्यान) हि संकल्पना घेत विविध प्रकारची वृक्ष व औषधीयुक्त वनस्पतींची लागवड करित आहे हि नक्कीच एक समाधानाची बाब आहे. पर्यावरणाला जिवलग मित्र समजणारे उद्योग पाहून अतिशय आनंद झाला असे भावोद्गार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी काढले. धारिवाल इन्फ्रास्ट्रक्टर लिमिटेड च्या ३.२ एकर क्षेत्रात होत असलेल्या “अरण्यगर्भ” मियावाकी फॉरेस्टच्या धरतीवर उभा असलेला घनवन उद्यान उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. Dhariwal Infrastructure’s ‘Aranyagarbha’

