Saturday, August 22, 2026
HomeMLAज्येष्ठ नागरिकांचा अनुभव समाजासाठी मार्गदर्शक ठरावा

ज्येष्ठ नागरिकांचा अनुभव समाजासाठी मार्गदर्शक ठरावा

चंद्रपूर :- ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे अनुभवसंपन्न मार्गदर्शक असूनत्यांच्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा उपयोग समाजाच्या प्रगतीसाठी झाला पाहिजे. शहरातील ज्येष्ठ नागरिक संघांच्या विकासासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असूनत्यांच्या आवश्यक सुविधांसाठी निधीही उपलब्ध करून दिला आहे. भविष्यातही ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी आवश्यक सहकार्य केले जाईलअसे प्रतिपादन MLA Kishor Jorgewar आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. The experience of senior citizens should serve as a guiding light for society

  परिवर्तन ज्येष्ठ नागरिक संघाला दोन वर्ष पूर्ण झाल्या बदल बाबूपेठ येथे  आयोजित कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार उपस्थित होते. यावेळी त्यांनी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या विविध प्रश्नांची तसेच अडचणींची आस्थेने विचारपूस केली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे मंडळ अध्यक्ष प्रदिप किरमेदिवाकर पूडट्टवारनगर सेविका लता सावमुकेश गाडगेबावणेशंकर कोल्हेभोयर आदिंची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले कीज्येष्ठ नागरिकांनी आपल्या आयुष्यात अनेक अनुभव घेतले असूनत्यांच्या अनुभवातून नव्या पिढीला योग्य दिशा मिळू शकते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यासोबतच त्यांना सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी करून घेणे आवश्यक आहे.

             शहरातील ज्येष्ठ नागरिक संघांना अधिक सक्षम करण्यासाठी आणि त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. विविध ज्येष्ठ नागरिक संघांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला असूनत्यांच्या गरजा लक्षात घेऊन पुढील काळातही आवश्यक सहकार्य केले जाईल. ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळासंवाद आणि सामाजिक उपक्रमांसाठी चांगल्या सुविधा मिळाव्यातयासाठीही प्रयत्न केले जातीलअसे त्यांनी सांगितले.

बाबूपेठ परिसराच्या विकासासोबतच नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत असल्याचेही आमदार जोरगेवार यांनी यावेळी सांगितले.

  कार्यक्रमाला परिवर्तन ज्येष्ठ मंडळाचे पदाधिकारीसदस्य तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी विविध प्रश्नांवर आमदार जोरगेवार यांच्याशी संवाद साधला.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular