पनवेल शेंडे, भद्रावती तालुका प्रतिनिधी
भद्रावती :- भद्रावती नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १ आणि ४ मधील रस्त्यांची झालेली दुरवस्था, जागोजागी पडलेले खड्डे आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाचा निषेध करण्यासाठी नागरिक व नगरसेवकांनी आज बुधवार दि. १९ ऑगस्ट रोजी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. डपरा – खंजिरी वाजवत नगरपरिषद प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी संतप्त नागरिकांनी चक्क ‘मच्छी पकडो’ आंदोलन करत रस्त्यांवरील खड्ड्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. Dapra-Khanjiri’ and ‘Catch the Fish’ protests to wake up the Bhadravati Municipal Council वॉर्ड निहाय मतदार याद्यांची अचूक तपासणी हेच प्राथमिक कर्तव्य…..
प्रभागातील रस्त्यांची दुरवस्था दूर करण्यासाठी संबंधित नगरसेवकांकडून नगराध्यक्षांकडे वारंवार निवेदने व सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यानंतरही समस्येकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन….
सध्या पावसामुळे प्रभागातील अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून, नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला असून, वाहनचालक व पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पालकमंत्र्यांचा आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसोबत संवाद…..
तात्पुरता उपाय म्हणून खड्डे बुजविण्यासाठी मुरूम उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, नगराध्यक्षांकडून मुरूम देण्यास नकार दिल्याचा आरोप करत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी डपरा-खंजिरी वाजवून ‘नगरपरिषदेला जागे करण्याचे’ आंदोलन करण्यात आले. SIR व पक्षसंघटन मजबुत करण्यावर काँग्रेसचा भर……
यावेळी नगरसेविका उर्वेला साव, नगरसेवक अनिल पडोळे, नगरसेविका श्रीमती सूर, नगरसेवक सुनील नामोजवार, समाजसेवक पनवेल शेंडे, नगरसेविका श्रीमती जाधव, नगरसेविका पल्लवी तामगाडगे, श्रीमती पवार, कल्पना भुसारी, नगरसेविका गिरडकर तसेच अनिल मेश्राम, प्रणय दरवेकर, विकी खडसे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत आणि नागरिकांना सुरक्षित रस्ते उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
#Bhadravati Municipal Corporation
