Wednesday, September 30, 2026
HomeUncategorizedस्व. कालिदास अहीर तथा हितेंद्र अहीर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 200 रक्तदात्यांचे रक्तदान

स्व. कालिदास अहीर तथा हितेंद्र अहीर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 200 रक्तदात्यांचे रक्तदान

डॉ. गंगारामजी अहीर चॅरीटेबल ट्रस्ट आयोजित

स्व. कालिदास अहीर तथा हितेंद्र अहीर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ

200 रक्तदात्यांचे रक्तदान

चंद्रपूर :- सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात कार्यरत युवकांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याकरिता झटणारे नेतृत्व स्व. कालिदास अहीर व स्व. हितेंद्र अहीर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉ. गंगारामजी अहीर चॅरीटेबल ट्रस्ट, चंद्रपूरच्या वतीने दि. 14 ऑगस्ट 2026 रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात 200 रक्तदात्यांनी उत्सफुर्तपणे रक्तदान करून सामाजिक व राष्ट्रीय कार्यात भरीव योगदान दिले.

          चंद्रपूर येथील महेश भवन येथे पार पडलेल्या या रक्तदान शिबीराचे दीप प्रज्वलन करून मान्यवर अतिथींनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी स्व.डॉ.  गंगारामजी अहीर, स्व. कालिदास अहीर, स्व. हितेंद्र अहीर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून त्यांच्या स्मृतिस अभिवादन केले.

          या कार्यक्रमास सर्वश्री हरीश्चंद्रजी अहीर, पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, आ. किशोर जोरगेवार, वरोराचे आमदार करण देवतळे, डॉ. अशोक जिवतोडे, वणीचे माजी आमदार संजय रेड्डी बोदकुरवार, राजुराचे माजी आमदारद्वय अॅड. संजय धोटे, सुदर्शन निमकर, महापौर सौ. संगिता खांडेकर, जिल्हा मध्य.सह.बॅंकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे, विजयजी राऊत, खुशाल बोंडे, युवा नेते रघुवीर अहीर, शामल अहीर, चंदन अहीर, हर्षवर्धन अहीर, शास. अभि. महा. प्राचार्य प्रशांत वाशिमकर, वणीचे माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, मधुसूदनजी रूंगठा, श्रीनिवास सुंचूवार, नगराध्यक्ष निलेश ताजने, देवानंद वाढई, मनपा गटनेते शेखर रेड्डी, सुभाष कासनगोट्टुवार, डॉ. नरेंद्र कोलते, अजय जयस्वाल, तुषार सोम, बलराम डोडाणी, मोहन चौधरी, आशिष माशिरकर, भालचंद्र दानव, प्रदीप किरमे, रविंद्र गुरनुले, अरूण तिखे, रामा मोरे, नगरसेविका सविता कांबळे, पुष्पा उराडे, सारीका संदूरकर, अनुजा तायडे, शितल गुरनुले, वंदना संतोषवार, वंदना हातगांवकर, शालुताई कन्नोजवार आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. 

  आपल्या मनोगतात पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी या रक्तदान शिबिरामागील भुमिका विषद करून स्व. कालिदास व स्व. हितेंद्र हे दोघे बंधू सामाजिक व क्रिडा क्षेत्रात कार्य करायचे, युवकांना सामाजिक व राष्ट्रीय प्रवाहात आणण्याकरिता त्यांनी सातत्याने परिश्रम घेतले. त्यांच्या या कार्याची स्मृती सतत स्मरणात राहावी या हेतुने तब्बल 20 वर्षांपासून रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक योगदान दिल्या जात आहे. याप्रसंगी त्यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानले.

  याप्रसंगी बोलतांना आ. किशोर जोरगेवार यांनी हंसराजभैय्यांच्या राजकीय व सामाजिक कार्याचा गौरवपूर्ण शब्दात उल्लेख करीत गेल्या 20 वर्षांपासून म्हणजेच 2 तपापासून सामाजिक बांधिलकीतून रक्तदान शिबीर आयोजित करून युवकांना रक्तदानासाठी प्रोत्साहीत करणे हे खऱ्या अर्थाने महान कार्य आहे. ज्याला रक्ताची किंमत कळली, त्यांना रक्तदान हे प्रत्येकाच्या जीवनातील मौल्यवान घटक असल्याचा आभास होतो. हंसराजभैय्यांच्या माध्यमातूनच चंद्रपूर शहरात खऱ्या अर्थाने रक्तदान चळवळीला गती मिळाली असल्याचे ते म्हणाले. हे कार्य निरंतर सुरू रहावे अशा भावना व्यक्त करून त्यांनी सर्व रक्तदात्यांप्रती आभार व्यक्त केले.

          कार्यक्रमाचे प्रास्ताविक खुशाल बोंडे यांनी केले. त्यांनीही अहीर कुटूंबियांचे रक्तदान व इतरही चळवळीतील योगदान अविस्मरणीय असल्याचे सांगितले. यावेळी तुषार सोम यांनीही समयोचित विचार व्यक्त केले.

          उपस्थित मान्यवरांनी अहीर कुटूंबियांच्या सामाजिक योगदानाबद्दल गौरवपुर्ण शब्दात प्रशंसा केली. या रक्तदान शिबीरात चंद्रपूर,  भद्रावती,  वरोरा,  बल्लारशाह,  जिवती,  कोरपना,  राजुरा,  वणी, पांढरकवडा, घुग्घूस व अन्य शहरातील रक्तदाते सहभागी झाले होते.

याप्रसंगी हंसराज अहीर व मान्यवर अतिथींच्या शुभहस्ते सर्व रक्तदाते व जिल्हा रक्तसंक्रमण विभागाचे तसेच नागपूर येथील लाईफलाईन ब्लड बॅंकेचे वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या चमुस स्मृतिचिन्ह, भेटवस्तु व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

          या रक्तदान शिबीरास डॉ. गायकवाड, दिलीप कपूर, प्रमोद शास्त्रकार, श्रीकांत भोयर, विनोद शेरकी, राजु घरोटे, विकास खटी, संजय खनके, किशोर बावने, अरुण मस्की, अंकुश आगलावे, संजय तिवारी, सुनिल उरकुडे, प्रशांत घरोटे, शाम कनकम, विनोद खेवले, राजेंद्र खांडेकर, प्रा. रवि जोगी, कमल कजलीवाले, पुनम तिवारी, गौतम यादव, प्रतिक शिवनकर, जगदिश दंडेले, दिनकर सोमलकर, सुभाष आदमने, मधुकर राऊत, सुरेश केंद्रे, केशव गिरमाजी, संतोष वडपल्लीवार, गणेश गेडाम, रामु भंडारी, राहुल सुर्यवंशी, मयुर भोकरे, विजय वानखेडे, निलेश खोलापूरे, दिवाकर पुद्दटवार, प्रविण गिलबिले, सचिन डोहे, यांचेसह भाजपा, भाजयुमो, महिला मोर्चाचे प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्ते व नागरिकांची बहुसंख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन राहुल बनकर यांनी केले.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular