नवी दिल्ली :- भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (FSSAI) ने देशातील काही लोकप्रिय मद्य ब्रँड्सच्या विशिष्ट प्रकारांच्या विक्रीवर बंदी घालत मोठी कारवाई केली आहे. Liquior Ban
तपासणीत उत्पादन मानकांचे उल्लंघन करत मद्यांमध्ये कृत्रिम स्वादवर्धक (फ्लेवर्स) वापरल्याचे आढळून आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. Sale of liquor brands banned; FSSAI takes action
तीन विधेयक,.. सरकार जो बदल सकते है….
एफएसएसआयच्या तपासणीनुसार, डियाजिओ इंडियाची युनायटेड स्पिरिट्स, इनब्रू बेवरेजेस आणि मोहन रॉकी स्प्रिंगवॉटर या कंपन्यांच्या काही उत्पादनांमध्ये नैसर्गिक परिपक्वता प्रक्रियेऐवजी मद्याची चव आणि सुगंध निर्माण करण्यासाठी बाहेरून कृत्रिम अथवा नैसर्गिक स्वरूपाचे फ्लेवर्स मिसळण्यात आले होते. भारतीय अन्न सुरक्षा नियमांनुसार अशा प्रकारे रममध्ये रम फ्लेवर किंवा व्हिस्कीमध्ये व्हिस्की फ्लेवर मिसळण्यास परवानगी नाही.
एफएसएसआयने मध्य प्रदेशात युनायटेड स्पिरिट्सच्या अँटिक्विटी ब्लू व्हिस्की आणि रॉयल चॅलेंज व्हिस्की, तसेच इनब्रू बेवरेजेसच्या बॅगपायपर डिलक्स व्हिस्की आणि ओल्ड कास्क डिलक्स XXX रम यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे.
याशिवाय महाराष्ट्रात मोहन रॉकी स्प्रिंगवॉटरद्वारे उत्पादित ओल्ड मॉन्कच्या तीन विशिष्ट प्रकारांच्या विक्रीलाही प्रतिबंध करण्यात आला आहे.
मात्र, ही कारवाई केवळ संबंधित उत्पादन केंद्रांमध्ये तयार झालेल्या उत्पादनांपुरती मर्यादित आहे की इतर राज्यांतील त्याच ब्रँडच्या उत्पादनांनाही लागू होणार आहे, याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टता देण्यात आलेली नाही.
एफएसएसआयने स्पष्ट केले आहे की, भारतीय अन्न सुरक्षा नियमांनुसार मद्यनिर्मितीत नैसर्गिक घटकांचा वापर आणि योग्य परिपक्वता प्रक्रिया आवश्यक आहे. प्रयोगशाळेतील तपासणीत काही उत्पादने निर्धारित मानकांनुसार नसल्याचे समोर आल्याने संबंधित उत्पादनांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
भारत हा जगातील सर्वात मोठ्या मद्य बाजारपेठांपैकी एक असून या उद्योगाचा वार्षिक महसूल सुमारे ४० अब्ज डॉलर्स इतका असल्याचा अंदाज आहे. अशा परिस्थितीत एफएसएसआयची ही कारवाई मद्य उद्योगासाठी महत्त्वपूर्ण मानली जात असून अन्न व पेय पदार्थांच्या गुणवत्तेबाबत नियामक संस्थेने कठोर भूमिका घेतल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
