Make the portrait of ‘Mahatma Jyotiba Phule’ mandatory in government offices, confer the ‘Bharat Ratna’ upon the Phule couple, and conduct a separate census for OBCs
चंद्रपूर :- देशातील सर्व शासकीय आणि प्रशासकीय कार्यालयांमध्ये राष्ट्रपुरुष आणि महापुरुषांची छायाचित्रे लावली जातात; मात्र बहुजन, वंचित आणि ओबीसी समाजाचे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचे छायाचित्र सर्व देशातील सरकारी कार्यालयांत अधिकृतपणे अनिवार्य करण्यात यावे, अशी लोकहितकारी मागणी खासदार तथा संसदेच्या ‘इतर मागासवर्गीयांच्या कल्याण संबंधीच्या समितीच्या’ सदस्य खासदार प्रतिभा धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांनी आज देहरादून येथे आयोजित समितीच्या उच्चस्तरीय बैठकीत लावून धरली. Make the portrait of ‘Mahatma Jyotiba Phule’ mandatory in government offices
यासोबतच, देशातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे व समतेचा संदेश देणारे युगपुरुष क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ BharatRatna हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे, अशीही जाहीर मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली. confer the ‘Bharat Ratna’ upon the Phule couple
संसदेच्या या समितीच्या वतीने सध्या देशपातळीवर महत्त्वाच्या बैठका व अभ्यास दौरे आयोजित केले जात आहेत. या राष्ट्रीय दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी देहरादून येथे पार पडलेल्या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी ओबीसी समाज, बहुजन अस्मिता आणि महापुरुषांच्या सन्मानाचे अनेक प्रलंबित विषय संपूर्ण ताकदीने मांडले. शासकीय कार्यालयांमध्ये सर्व महापुरुषांसोबतच महात्मा ज्योतिबा फुले यांचे तैलचित्र किंवा छायाचित्र अधिकृतपणे लावले गेलेच पाहिजे, जेणेकरून त्यांच्या क्रांतीकारी विचारांची प्रेरणा अखंडपणे प्रशासकीय व्यवस्थेला आणि जनतेला मिळत राहील, याकडे त्यांनी समितीचे विशेष लक्ष वेधले आणि यावर तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली. Conduct a separate census for OBCs
या बैठकीत अत्यंत अभ्यासूपणे आपली भूमिका मांडताना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी ओबीसी समाजाच्या हक्काचा अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत देशात आगामी काळात होणारी ओबीसींची स्वतंत्र जनगणना आधी करण्यात यावी आणि जनगणनेच्या अर्जात ओबीसींसाठी स्वतंत्र ‘कॉलम’ समाविष्ट करण्यात यावा, अशी आग्रही मागणी केली.
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी तत्कालीन अत्यंत खडतर व विषमतेच्या काळात स्वतःचे आयुष्य पणाला लावून बहुजन आणि महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. त्यांनी केलेल्या सामाजिक, शैक्षणिक व वैचारिक क्रांतीमुळेच आज भारतातील बहुजन व ओबीसी समाज ताठ मानेने जगत असून अशा महान राष्ट्रनिर्मात्यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळणे हा कोट्यवधी बहुजनांचा हक्क असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी संसदीय समितीच्या व्यासपीठावर ओबीसींच्या हक्काच्या स्वतंत्र जनगणनेसाठी, त्यांच्या रोजगारासाठी आणि महापुरुषांच्या सर्वोच्च सन्मानासाठी घेतलेल्या या कणखर आणि लोकाभिमुख भूमिकेचे संपूर्ण महाराष्ट्रातून आणि ओबीसी समाजबांधवांकडून अत्यंत कौतुक होत आहे.
संसदेत आणि संसदेबाहेरही सातत्याने जनसामान्यांचे प्रश्न, ओबीसी जनगणना आणि महापुरुषांच्या सन्मानाचा मुद्दा उचलून धरणाऱ्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या या ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण मागणीला आता सर्व स्तरांतून मोठा जनपाठिंबा आणि पाठबळ मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.
