Tuesday, May 12, 2026
HomeEducationalडॉ. हेमचंद दुधगवळी यांची मराठी प्राध्यापक परिषदेच्या कार्याध्यक्षपदी निवड

डॉ. हेमचंद दुधगवळी यांची मराठी प्राध्यापक परिषदेच्या कार्याध्यक्षपदी निवड

New Executive Committee of the Marathi Professors’ Council Announced

चंद्रपूर :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ तसेच गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली अंतर्गत कार्यरत असलेल्या मराठी प्राध्यापक परिषदेची 2026 ते 2029 या कार्यकाळासाठीची नवी कार्यकारिणी नुकतीच अविरोध जाहीर करण्यात आली. या निवडीत शरदचंद्र पवार महाविद्यालय गडचांदूर येथील मराठी विभाग प्रमुख, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. हेमचंद दुधगवळी यांची कार्याध्यक्षपदी निवड झाल्याने चंद्रपूर जिल्ह्यासह शैक्षणिक क्षेत्रात आनंद व्यक्त होत आहे. Dr. Hemchand Dudhagawali Elected as Working President परिषदेच्या अध्यक्षपदी कोराडी येथील तायवाडे कॉलेजचे डॉ. राजेंद्र वाटाणे यांची निवड करण्यात आली असून सचिवपदी सी.पी. अँड बेरार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. New Executive Committee of the Marathi Professors’ Council Announced

चंद्रपुरातील युवकांना जर्मनीमध्ये करियरची संधी…….

उपाध्यक्षपदी डॉ. शैलेंद्र लेंडे, डॉ. धनराज खानोरकर, डॉ. नरेंद्र आरेकर, डॉ. संजय निंबेकर, डॉ. मनीषा नागपुरे, डॉ. संगीता खुरद, डॉ. राजेश देशपांडे, डॉ. राकेश कमे आणि डॉ. हेमंत देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कोषाध्यक्ष म्हणून डॉ. सोपानदेव पिसे तर सहकोषाध्यक्ष म्हणून डॉ. संजय लाटेलवार काम पाहणार आहेत. सहसचिवपदी डॉ. परमानंद बावनकुळे, डॉ. शरद मेश्राम, डॉ. राज मुसने, डॉ. अशोक भक्ते, डॉ. अरविंद कटरे, डॉ. भूषण बंड, डॉ. विजय राऊत, डॉ. नरेंद्र घरत आणि डॉ. विनोद भालेराव यांची निवड झाली आहे.

राष्ट्रीय लोक अदालती मध्ये 1067 प्रकरणे निकाली…..

प्रकाशन प्रकल्पाची जबाबदारी डॉ. प्रशांत सूर्यवंशी, विजय रैवतकर आणि डॉ. देवयानी चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आली असून प्रसिद्धी प्रमुख म्हणून डॉ. यशवंत घुमे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कार्यकारिणी सदस्यांमध्ये डॉ. भूषण रामटेके, डॉ. नरेंद्र मुरमाडे, डॉ. प्रेमा चोपडे, डॉ. अमृता डोर्लीकर, डॉ. राष्ट्रपाल मेश्राम, डॉ. देवमन कामडी, डॉ. मंजुषा गभणे, डॉ. राजेश दिपटे, डॉ. अनिल बोपचे, डॉ. सुधीर मोरे, डॉ. प्रवीण काळे, डॉ. बंडू चौधरी, डॉ. निलीमा कापसे आणि डॉ. पराग सपाटे यांचा समावेश आहे.

उकनी खाण दुर्घटना…, खासदारांकडून पाहणी…….

जिल्हानिहाय प्रमुखांची घोषणा

परिषदेच्या कार्याचा विस्तार आणि समन्वय साधण्यासाठी विविध जिल्ह्यांसाठी प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर शहरासाठी डॉ. संजय सिंगनजुडे, डॉ. प्रीती उमाठे आणि डॉ. राखी जाधव, नागपूर ग्रामीणसाठी डॉ. प्रमोद लेंडे आणि डॉ. प्रवीण घारपुरे, भंडारा जिल्ह्यासाठी डॉ. कविता राजाभोज, डॉ. रामलाल चौधरी आणि डॉ. जयश्री सातोकर यांची निवड झाली आहे.

गोंदिया जिल्ह्यासाठी डॉ. जगदीश भैसारे आणि डॉ. इंद्रकला बोपचे, गडचिरोली जिल्ह्यासाठी डॉ. गणेश चुधरी, डॉ. प्रदीप चापले आणि डॉ. विलास खुणे, तर चंद्रपूर जिल्ह्यासाठी डॉ. माधव कांडणगिरे, डॉ. जयश्री शास्त्री आणि डॉ. सुनंदा चरडे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यासाठी डॉ. सुधाकर भुयार आणि डॉ. प्रमोद नारायणे यांची निवड करण्यात आली आहे.

1968 पासून परिषदेची शैक्षणिक परंपरा
1968 पासून कार्यरत असलेल्या या परिषदेने आजवर 36 यशस्वी अधिवेशने आयोजित केली असून ‘अध्यापनाची विचारसूत्रे’ आणि ‘संवादिनी’ यांसारखी महत्त्वपूर्ण पुस्तके प्रकाशित केली आहेत.

नवीन कार्यकारिणीला डॉ. राजन जयस्वाल, डॉ. सत्यवान मेश्राम, डॉ. शरयू तायवाडे, डॉ. श्याम मोहरकर आणि प्रा. श्रीकांत नाकाडे यांचे मार्गदर्शन लाभणार असून मराठी प्राध्यापकांच्या शैक्षणिक, वैचारिक आणि साहित्यिक विकासासाठी परिषद अधिक प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular