Demand to File Case Against Municipal Commissioner – Rising Pollution in Ramala Lake
चंद्रपूर :- ऐतिहासिक गोंडकालीन वारसा लाभलेल्या रामाळा तलावातील वाढत्या प्रदूषणामुळे Pollution in Ramala Lake शहरात तीव्र संतापाची लाट उसळली असून, या प्रकरणी मनपा प्रशासनाविरोधात कारवाईची मागणी जोर धरत आहे. संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थाचे संस्थापक अध्यक्ष राजेश बेले यांनी थेट मनपा आयुक्तांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करत शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. Demand to File Case Against Municipal Commissioner
बल्लारशाह – मुबई – पुणे ट्रेन लवकरच धावणार….
दिनांक 25 एप्रिल 2026 रोजी उघडकीस आलेल्या या प्रकारानंतर तलावातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. तलावातील पाणी अत्यंत दूषित झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर मासे मृत अवस्थेत आढळून आले आहेत. यामुळे तलावातील सूक्ष्म जीवसृष्टीही नष्ट होत असून, परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे.
27 एप्रिल रोजी करण्यात आलेल्या प्रत्यक्ष पाहणीत तलावाची स्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे निदर्शनास आले. तलावातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून, त्यांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राजेश बेले यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, “तलावाचे जतन व स्वच्छता ही चंद्रपूर महानगरपालिकेची प्राथमिक जबाबदारी असताना प्रशासनाने पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पर्यावरणासह नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे.”
याप्रकरणी अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. परिणामी, संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून तलावाची स्वच्छता व पुनरुज्जीवनासाठी त्वरित उपाययोजना करण्यात याव्यात, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.
