A Free Opportunity for Pre-Training for Officer Positions in the Indian Armed Forces
चंद्रपूर :- भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड या परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे 4 ते 13 मे 2026 या कालावधीत कोर्स आयोजित करण्यात येत आहे. सदर कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन, आणि प्रशिक्षणाची निःशुल्क सोय करण्यात आली आहे. Free Opportunity for Pre-Training for Officer Positions in the Indian Armed Forces
तरी चंद्रपूर जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, चंद्रपूर येथे 27 एप्रिल 2026 रोजी मुलाखतीस हजर रहावे. इच्छुक उमेदवारांनी www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर किंवा व्हॉट्सॲप क्रमांक 9156073306 या मोबाईल नंबर वर SSB-65 हा मेसेज केल्यास कोर्ससाठी संबंधित परिशिष्ट व्हॉट्सॲप द्वारे पाठवले जातील.
मुलाखतीकरीता प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली प्रिंट सोबत घेऊन यावी.
एस.एस.बी. कोर्स मध्ये प्रवेश मिळण्यासाठी 1) कम्बाइंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन अथवा नॅशनल डिफेन्स एकॅडमी एक्झामिनेशन पास असावे व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. 2) एन.सी.सी. स्पेशल एन्ट्री साठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. 3) टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे.
यापैकी नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र घेऊन येणे आवश्यक आहे, असे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने कळविले आहे.