Saturday, July 18, 2026
HomeAgricultureबळीराजाला खुश करणारा अर्थसंकल्प ; विदर्भालाही भरीव तरतूद

बळीराजाला खुश करणारा अर्थसंकल्प ; विदर्भालाही भरीव तरतूद

Budget that makes farmers happy; Substantial provision for Vidarbha too

चंद्रपूर :- महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प आज (दि.६) ला सन्मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतः मांडला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांकरिता भरीव तरतूद करण्यात आल्याने, हा अर्थसंकल्प शेतकरी हिताचा अर्थसंकल्प ठरला असून बळीराजाला खुश करणारा अर्थसंकल्प असल्याचे भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अशोक जीवतोडे यांनी म्हटले आहे. Budget that makes farmers happy; Substantial provision for Vidarbha too

महाराष्ट्र राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना जाहीर केली आहे

राज्यात २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली. सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत कर्ज असलेल्या पात्र शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. २ लाख रु. पर्यंत कर्ज माफ होईल. नियमित कर्ज फेड करणाऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे. कर्जमाफी योजनेसाठी समिती गठीत करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांकरिता भरीव तरतूद

मागेल त्याला कृषी पंप योजना, शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना, मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजना, बांबू विकास प्रकल्प वाढविणार, ४ कृषी विद्यापीठात AI ची मदत, नदीजोड प्रकल्पाची कामे पूर्णत्वास आणण्यावर भर.

विदर्भासाठी भरीव तरतूद

गडचिरोली स्टील हब साठी २ लाख कोटी रु. ची तरतूद, तिसरी चित्रनगरी नागपूर जवळ रामटेकला होणार, नागपूर मधे महाराष्ट्र आरोग्य संस्था स्थापन करणार; बल्लारपुरला टिंबर म्युझियम उभारणार.

विकसित महाराष्ट्र २०४७ चे लक्ष असलेला अर्थसंकल्प

महाराष्ट्र देशाचे स्टार्ट अप कॅपिटल; राज्यात ५० हजार स्टार्ट अप सुरु करण्याचे उद्दिष्ट; युनिकॉर्न मधे महाराष्ट्र प्रथम; महाराष्ट्र राज्य डिजिटल राज्य बनण्याचा उद्देश; परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल, महाराष्ट्र डिजिटल तंत्रज्ञान अभियान राबविले जाणार; राज्यात १ लाख २५ हजार उद्योजक घडविणार; महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून ७५ हजार पदे भरल्या जाणार; ३६ नवदिशा केंद्र स्थापन होणार; जमिनीचे १०० टक्के व्यवहार संगणीकृत करणार; कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग व सायबर सुरक्षा धोरण राबविणार; २३ हजार किलोमीटरचे नविन रस्ते, राज्य खासगी भागीदारी धोरणास मंजुरी; लाडकी बहिण योजना अबाधित राहील; मोटार वाहन करात ३०% सूट; अटल सेतू परिसरात नविन मुंबई तयार करणार; आदी

याप्रकारे झालेल्या भरीव तरतुदी करिता डॉ. अशोक जीवतोडे यांनी राज्य सरकारचे अभिनंदन केले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular