Republic Day celebrated at Chandrapur Municipal Corporation
चंद्रपूर :- चंद्र्पुर शहर महानगरपालिकेच्या वतीने भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवार दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७:५० वाजता महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात आयुक्त अकनुरी नरेश,भा.प्र.से. यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. Republic Day celebrated at Chandrapur Municipal Corporation
सकाळी ७.४० वाजता महानगरपालिका कार्यालयासमोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास माल्यार्पण केल्यावर सकाळी ७.५० वाजता महानगरपालिका कार्यालयाच्या इमारतीवर आयुक्त अकुनुरी नरेश यांच्या हस्ते राष्ट्रध्वजास ध्वजारोहण व मानवंदना देण्यात आली. यावेळी आयुक्त यांनी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे स्वागत केले. चंद्रपूर महानगरपालिकेचे कामकाज चांगल्या पद्धतीने सुरु असुन गतिमान प्रशासनासाठी नियोजनबद्ध कार्य करण्याच्या सुचना दिल्या.
यावेळी अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त संदीप चिद्रवार, मुख्य लेखा परीक्षक मनोज गोस्वामी, शहर अभियंता रवींद्र हजारे. नगरसचिव नरेंद्र बोबाटे, डॉ. नयना उत्तरवार, डॉ.अमोल शेळके, सचिन माकोडे, राहुल पंचबुद्धे, अनिल घुमडे, विजय बोरीकर यांच्यासह नवनियुक्त नगरसेवक, सर्व विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

