Shiv Sena office bearers join Congress party
चंद्रपूर :- वरोरा येथील खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात आज एका महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडीत शिवसेनेच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून काँग्रेसच्या ‘हात’ हाती घेतला. खासदार प्रतिभा धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा संपन्न झाला. यामुळे वरोरा शहर आणि माजरी परिसरातील काँग्रेस पक्षाची ताकद अधिक वाढल्याचे बोलले जात आहे. ShivSena office bearers join Congress party
निहाल सिद्दीकी, रवी रॉय, रवी भोगे, मुन्ना वर्मा यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश घेतला आहे. प्रवेशानंतर निहाल सिद्दीकी यांची तत्काळ माजरी शहर काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली, हे विशेष.
यावेळी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अहेतशाम अली, माजी नगरसेवक राजू महाजन, राकेश दोंतावार यांच्यासह वरोरा व माजरी परिसरातील काँग्रेसचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. Public entry into Congress party in the presence of MP Pratibha Dhanorkar
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत करताना सांगितले की, “या सर्व अनुभवी आणि कार्यक्षम कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाला मोठी ऊर्जा मिळाली आहे. त्यांचे जनसंपर्काचे बळ काँग्रेसला निश्चितच उपयोगी पडेल. सध्या देशात आणि राज्यात सुरू असलेल्या लोकशाहीविरोधी कारभाराला कंटाळून हे सर्वजण काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष विचारधारेवर विश्वास ठेवून पक्षात आले आहेत. त्यांच्या माध्यमातून सामान्य जनतेचे प्रश्न अधिक प्रभावीपणे सोडवता येतील.”
प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षाला अधिक बळकट करण्यासाठी आपण पूर्ण क्षमतेने काम करू, अशी ग्वाही दिली.