Congress leader Lakhan Hikre joins BJP in the presence of MLA Kishore Jorgewar
चंद्रपूर :- भारतीय कोळसा मजदूर संघ वणी क्षेत्राचे क्षेत्रीय अध्यक्ष तसेच काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते लखन मारोती हिकरे आणि सूरज हिकरे यांनी मंगळवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आमदार किशोर जोरगेवार MLA Kishor Jorgewar यांच्या राजमाता निवासस्थानी आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत त्यांनी हा प्रवेश केला. आमदार किशोर जोरगेवार यांनी पक्षाचा दुपट्टा टाकून त्यांचे पक्षात स्वागत केले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, घुग्घूस शहर अध्यक्ष संजय तिवारी, विधानसभा अध्यक्ष दशरथ सिंह ठाकूर, बलराम डोडाणी, महामंत्री रवी गुरनुले, घुग्घूस शहर उपाध्यक्ष अनिल बाम, घुग्घूस युवा मोर्चा अध्यक्ष संतोष नुने, घुग्घूस महामंत्री साजन गोने, युवा मोर्चा महामंत्री स्वप्निल वाढई, हेमंत उरकुडे, गणेश पिंपळकर आदींची उपस्थिती होती.
प्रवेशानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, भारतीय कोळसा मजदूर संघाचे क्षेत्रीय अध्यक्ष आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते लखन हिकरे तसेच सूरज हिकरे यांनी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी PM Narendra Modi आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadanvis यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. पक्षाच्या जनविकास आणि राष्ट्रहिताच्या विचारधारेवर चालत ते जनहितासाठी कार्य करतील, असे ते म्हणाले.
भाजपमध्ये प्रवेशानंतर लखन हिकरे म्हणाले की, भारतीय जनता पक्ष ही विकास आणि राष्ट्रहिताला प्राधान्य देणारी पक्ष संस्था आहे. या विचारधारेत सहभागी होत मी परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा संकल्प घेतला आहे. त्यांच्या सोबत सूरज हिकरे यांच्या प्रवेशामुळे स्थानिक युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, घुग्घूस परिसरातील पक्षसंघटन अधिक मजबूत होण्यास हातभार लागणार आहे.