Saturday, May 30, 2026
HomeCrimeचंद्रपूर शहर पोलीसांची उत्कृष्ट कामगिरी

चंद्रपूर शहर पोलीसांची उत्कृष्ट कामगिरी

Excellent performance by Chandrapur city police

चंद्रपूर :- शहरातील घरफोडीच्या गुन्हयातील मुद्देमालाची न्यायालयीन प्रकिया पूर्ण झाल्यानंतर चंद्रपूर शहर पोलिसांनी फिर्यादीस १,७७,३९० रुपयांचा मौल्यवान माल परत केला आहे. या कामगिरीचे शहरात कौतुक होत आहे. House burglary returned to complainant काँग्रेस चे जनआक्रोश व चक्काजाम आंदोलन

सविस्तर वृत्त असे की, दिनांक २० जानेवारी २०२५ रोजी फिर्यादी विनोद मधुकर अनंतवार (रा. बागला चौक, महाकाली वार्ड, चंद्रपूर) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दि. १४ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी घर बंद करून ते बाहेर गेले असता, अज्ञात चोरट्यांनी दरवाज्याचे कुलूप तोडून आलमारीतील ३५ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीस नेले होते.

तक्रारीनुसार पोलीस स्टेशन चंद्रपूर शहरात अप. क्र. ५१/२०२५, कलम ३३१(४) भारतीय न्याय संहिता-२०२३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. काही तासांतच पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याकडून एक सोन्याची चैन, कानातील जोड लटकन आणि सोन्याचे डोरले मणीसह एकूण १,७७,३९० रुपये किंमतीचा माल हस्तगत केला. घुग्गुस शहराच्या सर्वसमावेशक विकासावर भर द्या

सदर मुद्देमाल पोलीस ठाण्यात जमा ठेवण्यात आला होता. न्यायालयीन प्रकियेअंती दिनांक १० ऑक्टोबर २०२५ रोजी सुपूर्दनामा आदेश मिळाल्यानंतर संबंधित माल फिर्यादीस परत करण्यात आला. Excellent performance by Chandrapur city police

ही कामगिरी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या नेतृत्वात मपो. ह.वा. निता भगत व पो.अं. शिवाजी गोरे यांनी केली.

फिर्यादीस चोरीचा माल परत मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून, नागरिकांनी चंद्रपूर शहर पोलीसांच्या तत्परतेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular