Thursday, September 3, 2026
HomeAgricultureवेकोलि अधिग्रहीत भुमीचा मोबदला वाढवून मिळेल, कोल इंडियाची तत्वतः मान्यता

वेकोलि अधिग्रहीत भुमीचा मोबदला वाढवून मिळेल, कोल इंडियाची तत्वतः मान्यता

The compensation for the acquired land will be increased, Coal India agrees in principle

चंद्रपूर  :– वेकोलि बल्लारपूर नॉर्थ वेस्ट खुली खदान प्रकल्पांतर्गत जमिनीचे मोबदले वाढवून मिळावेत, या मागणीसाठी शेकडो प्रकल्पग्रस्त मागासवर्गीय व इतर शेतकऱ्यांनी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर Hansraj Ahir, Chairman of the National Commission for Backward Classes यांची भेट घेतली. यावेळी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहीर यांचीही प्रमुख उपस्थिती होती. compensation for the acquired land will be increased

जिल्हा भाजपा सचिव मधुकर नरड, माजी जिल्हाध्यक्ष (किसान आघाडी) राजु घरोटे आणि कोलगावचे उपसरपंच पुरुषोत्तम लांडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी अहीर यांना निवेदन सादर केले. आर/आर धोरणानुसार नोकरीसोबतच प्रति एकर मोबदल्यात दरवाढ मिळावी, अशी मागणी करण्यात आली.

हंसराज अहीर यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले की, न्याय मिळवून देणे हा आमचा उद्देश असून, दरवाढ हा शेतकऱ्यांचा हक्क आहे.” कोल इंडिया आणि राज्य सरकारच्या सन २०१२ च्या धोरणानुसार कोरडवाहू जमिनीस ८ लाख रुपये व सिंचित जमिनीस १० लाख रुपये दर ठरवण्यात आला होता. मात्र आजच्या बाजारमूल्याच्या तुलनेत हे दर कमी असल्यामुळे दरवाढीचा मुद्दा कोलकाता येथील १० जुलै रोजीच्या बैठकीत उचलून धरल्याचे त्यांनी सांगितले.

कोल इंडिया अध्यक्ष पी. मल्लिकार्जूना प्रसाद आणि नागपूर येथील वेकोलि मुख्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर या दरवाढीचा आग्रह करण्यात आला असून, कोल इंडिया प्रबंधनाने यावर सकारात्मक भूमिका घेतली आहे, असेही अहीर यांनी स्पष्ट केले. Coal India agrees in principle

अहीर पुढे म्हणाले की, दरवाढ लवकरात लवकर जाहीर होण्यासाठी आपण पाठपुरावा करीत असून, ज्यांच्या करारनाम्यांमध्ये २०१२ च्या दरांचा उल्लेख आहे, तो हटवण्याबाबतही वेकोलि प्रशासनाला सूचना केली जाईल.

कोलगाव येथील उर्वरित ३३७ हेक्टर जमीन अधिग्रहण आणि गावाच्या पुनर्वसनासाठीही आपण ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

शेतकऱ्यांनीही अहीर यांच्याशी संवाद साधताना, “आमच्या जिवीतावर निर्माण होणाऱ्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर आपले सहकार्य आणि पाठबळ आम्हाला आश्वासक वाटते,” असा विश्वास व्यक्त केला.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular