Gang of fake policemen posing as a flying squad arrested
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यात खोटे पोलिस असल्याचा बनाव करून नागरिकांकडून खंडणी वसूल करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत मुल पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात एकूण १३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. Gang of-fake police arrested
घटना कशी उघडकीस आली
दिनांक ३ जुलै २०२५ रोजी चिरोली येथील सुरेश लक्ष्मण गणमेनवार यांच्या घरी एक पांढऱ्या रंगाची अर्टिका कार (MH34-CJ-5824) येऊन थांबली. त्यामधील आरोपींनी आपण चंद्रपूर पोलिस भरारी पथकाचे असल्याची बतावणी करून, त्यांच्या घरी मिळालेल्या विनापरवाना दारूवर कारवाई करण्याची धमकी दिली. त्यानंतर १५,००० रुपयांची मागणी करण्यात आली व तडजोड करून १०,००० रुपयांची खंडणी वसूल करण्यात आली.
याच टोळीने डोंगरगाव येथील एजाज शेख यांच्या अंडा-आमलेट दुकानात जाऊन, दुकानात दारू पिणाऱ्यांची माहिती देत कारवाई करण्याचा धाक दाखवून पुन्हा १०,००० रुपयांची मागणी केली आणि तडजोड करून ५,००० रुपये घेतले. Gang of extortionists falsely claiming to be police
या फिर्यादीने मुल पोलिस ठाण्यात दिनांक १३ जुलै रोजी दिलेल्या तक्रारीनुसार अपराध क्रमांक २५३/२०२५, कलम ३०८(२), २०४, ३(५) भारतीय न्याय संहिता-२०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. Mul Police Station
मूल पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत आरोपी बादल दुर्गाप्रसाद दुबे (वय ३६ वर्ष), रा. रेंगेपार, साकोली, भंडारा, सौ. संगीता बादल दुबे (वय २७ वर्ष), रा. रेंगेपार, साकोली, भंडारा, अजय विजय उईके (वय ३१ वर्ष), रा. गजानन मंदिर रोड, शितला माता मंदिर मागे, चंद्रपूर यांना अटक केली तर आरोपी देवेंद्र चरणदास सोनवणे (वय ३० वर्ष) याचा शोध सुरू आहे.
वरील आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली पांढऱ्या रंगाची अर्टिका कार क्र. MH34-CJ-5824 किंमत अंदाजे १२,५०,०० रुपये, तीन मोबाईल (विवो व ओपो कंपनीचे) किंमत अंदाजे ४५,००० रुपये व रोख रक्कम १५,००० रुपये असा एकूण १३,१०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे व प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनात मूल पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली सपोनि सुबोध वंजारी, पोहव जमीर खान पठाण, भोजराज मुंडरे, चिमाजी देवकते, नरेश कोडापे, शंकर बोरसरे, संदिप चुधरी यांच्या पथकाने कारवाई केली.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन:
अशा प्रकारच्या बनावट पोलिसांकडून खंडणी मागितली जात असल्यास तात्काळ जवळच्या पोलिस ठाण्यात किंवा चंद्रपूर पोलिस नियंत्रण कक्ष ११२ वर संपर्क साधावा. पोलिसांना योग्य माहिती देऊन सहकार्य करावे असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.