MP Pratibha Dhanorkar provides urgent help to accident-affected woman
चंद्रपूर :- चंद्रपूर येथील रेल्वे क्रॉसिंगजवळ काही दिवसांपूर्वी झालेल्या एका भीषण अपघातात Railway Accident रामकला रामचंद्र सिडाम रा. मुधोली ता. भद्रावती ही महिला गंभीर जखमी झाली. या अपघातात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, मेंदूत रक्तस्राव झाल्याने तिची प्रकृती चिंताजनक बनली आहे. ही माहिती मिळताच खासदार प्रतिभा धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांनी तात्काळ रामकलाला मदतीचा हात पुढे केला. त्यांच्या माध्यमातून सुयोग भोयर यांनी तिचा मुलगा धर्मा याला आर्थिक मदत दिली आहे. urgent help to accident-affected woman
अपघातग्रस्त रामकला यांचा मुलगा धर्मा याची कौटुंबिक आणि आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. तो सध्या चंद्रपूर येथे BSW च्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे आणि शासकीय वसतिगृह क्रमांक २ मध्ये राहून शिक्षण घेत आहे. त्याच्या कुटुंबाकडे कोणतीही स्थावर मालमत्ता नाही. २०१७ मध्ये धर्माचे वडील वारले असून, रामकला स्वतः मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. एकीकडे स्वतःचे शिक्षण आणि दुसरीकडे आपल्या आईच्या उपचाराची आणि कुटुंबाची जबाबदारी, अशा दुहेरी परिस्थितीत धर्मा संघर्ष करत असतानाच हा दुर्दैवी अपघात घडला आहे.
सध्या रामकलावर दीक्षित हॉस्पिटल, चंद्रपूर येथे उपचार सुरू आहेत. तिच्या उपचारासाठी मोठ्या आर्थिक मदतीची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी तातडीने मदत करून माणुसकीचा आदर्श घालून दिला आहे.
 
                                    


