Friday, April 17, 2026
HomeMaharashtraसुभाष कासनगोट्टूवार नवे भाजपा महानगर अध्यक्ष

सुभाष कासनगोट्टूवार नवे भाजपा महानगर अध्यक्ष

Subhash Kasangottuwar is the new Chandrapur BJP Metropolitan President

चंद्रपूर :- भारतीय जनता पक्षाच्या चंद्रपूर महानगर अध्यक्ष पदी इंजि. सुभाष कासनगोट्टूवार यांची वर्णी लागली आहे. तर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पद हरीश शर्मा यांना पुनश्च देण्यात आले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी बहुतांश जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष पदी नवीन नियुक्ती केल्यात परंतु चंद्रपूर शहरात आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार या दोन गटात रस्सीखेच असल्याने पक्षश्रेष्ठींनी येथील निवड रोखून ठेवली होती, शेवटी आज जोरगेवार गटाचे सुभाष कासनगोट्टूवार यांना चंद्रपूर महानगर अध्यक्ष पदी नियुक्त करण्यात आले आहे.

चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष व चंद्रपूर महानगर अध्यक्ष पदाकरीता जोरगेवार व मुनगंटीवार गटाचे रस्सीखेच सुरू होते. याआधी सुधीर मुनगंटीवार गटाचे राहुल पावडे हे महानगर अध्यक्ष तर हरिश शर्मा हे जिल्हाध्यक्ष पदी होते, महाराष्ट्र भाजपा श्रेष्ठींनी हरीश शर्मा यांची पुनश्च चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी निवड केली असून महानगर अध्यक्ष पदी आमदार किशोर जोरगेवार गटाचे सुभाष कासनगोट्रूवार यांची निवड करण्यात आली आहे.

इंजि. सुभाष कासनगोट्रूवार हे भाजप पक्षातील फार जुने कार्यकर्ते असून जनसामान्यांना, चंद्रपूरकरांना त्याचा दांडगा परिचय आहे, सुभाष कासनगोट्रूवार हे तुकूम प्रभागातील माजी नगरसेवक असून त्यांच्या जनसंपर्क कार्यालयातून अनेकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य त्यांनी केले आहे.

सुभाष कासनगोट्रूवार यांच्या निवडीने आमदार जोरगेवार गटात आनंदाचे तर मुनगंटीवार यांच्या गटात गम पसरला असल्याचे बोलले जात आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular