Friday, April 17, 2026
HomeAccidentमनसे पदाधिकाऱ्यांवर सावली पोलीसांनी केले खोटे गुन्हे दाखल

मनसे पदाधिकाऱ्यांवर सावली पोलीसांनी केले खोटे गुन्हे दाखल

Savali police filed false cases against MNS office bearers

चंद्रपूर :- मनसे पदाधिकारी यांनी आडवीतीडवी हायवा गाडी चालवत असलेल्या गाडीला अडवून दारू पिऊन गाडी चालविणाऱ्या ट्रक ड्राइव्हर विरोधात पोलीस स्टेशन सावली येथे मोबाईल वरून तक्रार केली असतांना व रेती चा ट्रक असल्याने RTO निरीक्षक पायघन यांना सुद्धा फोन करून बोलावले असतांना सावली पोलीस स्टेशन येथे ट्रक ड्राइव्हर वर दबाव टाकून व त्याला मारझोड करून मनसे पदाधिकाऱ्या विरोधात लिहिलेल्या तक्रारीवर सही करण्यास लावून त्यांच्यावर गुन्हे दाखल केल्याने या खोट्या गुन्ह्यात अडकविणाऱ्या सावली पोलीस अधिकाऱ्यांची मनसे पदाधिकाऱ्यांनी पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे तक्रार करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पत्रकार परिषद घेऊन केली आहे.
यावेळी ज्या ट्रक ड्रायव्हर ला मारहान करून खोटी तक्रार द्यायला लावली तो ट्रक ड्राइवर पत्रकार परिषदेत उपस्थित असल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं आहे. Savali police filed false cases against MNS office bearers

मनसे पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेची सावली तालुक्यातील हिरापूर टोल नाक्यावर शाखा उदघाटन करण्यासाठी मनसे पदाधिकारी अमन अंधेवार, राजू कुकडे, महेश वासलवार व सुनील गुढे हे दिनांक 7 एप्रिल 2025 ला सायंकाळी 5.30 वाजता गेले होते व त्यांनंतर परत येताना सायंकाळी 6.30 वाजता मनसे पदाधिकारी परत निघाले असतांना खेडी फाटा जवळ एक हायवा ट्रक आडवा-तिडवा जातं असतांना दिसला त्यामुळे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार यांनी या ट्रक मुळे समोर अपघात होऊ नये यासाठी तो ट्रक थांबवला, ट्रक मधून ड्राइव्हर बाहेर आल्यानंतर ड्राइव्हर दारू पिऊन असल्याचे लक्षात येताच व गाडीत रेती असल्यामुळे त्यांनी RTO निरीक्षक पायघन यांना फोन केला, त्यानंतर सावली पोलीस स्टेशन उपनिरीक्षक मुसळे यांना फोन केला, मात्र ते उशिरा म्हणजे पाऊण तासाने आले त्या दरम्यान उभ्या असलेल्या ट्रक ला एक ऑटो येऊन धडकला व पलटी झाला तो ऑटो ड्राइवर सुद्धा दारू पिऊन होता,
दरम्यान मनसे पदाधिकारी यांनी ऑटो चालकाला मदत करून त्याचा पलटी झालेला ऑटो उभा केला दरम्यान पोलीस घटनास्थळी आल्यावर त्यांनी सर्व पाहणी केली आणि ट्रक ड्राइव्हर ला ट्रक सावली पोलीस स्टेशनं येथे लावायला लावला आणि मनसे पदाधिकारी यांना पीएसआय मुसळे यांनी सांगितले की, आम्ही ट्रक ड्राइव्हर वर ड्रॅंक अँड ड्राईव्ह Drunk And Drive चा गुन्हा दाखल करतो, मात्र ऑटो वाल्यावर ड्रॅंक अँड ड्राईव्ह चा गुन्हा दाखल करणार नाही, आता तुम्ही जाऊ शकता असे म्हणाले,
दरम्यान मनसे पदाधिकाऱ्यांना पोलीस स्टेशनं सावली येथे बोलावले नसल्याने मनसे पदाधिकारी चंद्रपूर ला पोहचले असतांना सावली पोलिसांनी ट्रक ड्राइव्हर वर दबाव आणून व त्याला मारझोड करून मनसे पदाधिकारी यांच्याविरोधात स्वतः तक्रार तयार करून त्याची सही घेतली आणि खोटा गुन्हा दाखल केला. MNS office bearers file complaint with Chief Minister along with Inspector General of Police
त्यामुळे मनसे पदाधिकारी यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadanvis यांच्यासह पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे, Raj Thakre पोलीस महासंचालक, पोलीस महानिरीक्षक, राष्ट्रीय मानावाधिकार आयोग व राज्य मानवी हक्क आयोग मुंबई यांना निवेदन देऊन खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी आयोजित पत्र परिषदेतून केली आहें.

 

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular