शहरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयात मुलीं साठी तक्रार पेटी लावा जिल्हा पोलिस अधिक्षकां कडे भाजपा महिला आघाडी ची मागणी
जून महिन्यात शहरातील सर्व शाळा व महाविद्यालये सुरू झालेली आहेत. सध्याची सामाजिक स्थिती बघता महिलांच्या, मुलींच्या बलात्कार, छेडखानी, विनयभंग, मुलींना बघून अश्लील हावभाव करणे, अपशब्द वापरणे, लैंगिक शब्द असलेल्या शिव्या देणे वा मुद्दाम मुलींना बघून असे शब्द असलेले टोमणे मारणे असे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
असे प्रकार घडल्यावर अनेकदा महिला किंवा मुली कोणालाही काही सांगू शकत नाही. अशा गोष्टी सांगणे म्हणजे आपली बदनामी होईल किंवा आपल्यालाच वाईट समजल्या जाणार म्हणून शाळेतील किंवा महाविद्यालयातील शिक्षकांना इतकेच नाही तर घरी सुद्धा असे प्रकार सांगण्यासाठी मुली कचरतात. म्हणून त्यांना आपल्यावर झालेला अन्याय व्यक्त करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलिसांच्या माध्यमातून सर्व शाळा, महाविद्यालयात एक तक्रारपेटी ठेवण्यात यावी अशी मागणी भाजप महिला आघाडी कडून जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या करण्यात आली.
तसेच वेळोवेळी ही तक्रार पेटी उघडल्या जाऊन त्यातील मुलींच्या व महिलांच्या अडचणी,त्यांच्यावर झालेला अन्याय जिल्हा पोलिसांनी समजून या माध्यमातून चंद्रपूर पोलिसांच्या मदतीने मुलींमध्ये अन्यायाविरुद्ध लढण्याची एक शक्ती निर्माण होईल. असे निवेदन भाजप महिला आघाडी कडून जिल्हा पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांना देण्यात आले.यावेळी महानगरपालिका सभागृह नेता जयश्री जुमडे, नम्रता आचार्य-ठेमस्कर , नगरसेविका सविता सरकार, महिला शहर अध्यक्ष छबु वैरागडे, माजी नगरसेविका चंद्रकाला सोयाम, आशा आबोजवार, कल्पना बगुलकर, मोनिशा महातव, सीमा धुर्वे, हिना शेख, समिस्ता शेख, रुपाली आंबटकर, ज्योती वेलके यांची उपस्थिती होती.