Tuesday, August 25, 2026
HomeEducationalकमलादेवी महाविद्यालयात ‘आय.सी.टी. व पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन’ कार्यशाळा

कमलादेवी महाविद्यालयात ‘आय.सी.टी. व पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन’ कार्यशाळा

चंद्रपूर :- सर्वोदय महिला मंडळ, चंद्रपूरद्वारा संचालित कमलादेवी शिक्षण महाविद्यालय, बालाजी वॉर्ड, चंद्रपूर येथे ‘आय.सी.टी. आणि पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा सौ. नीलजी बजाज व सचिव भरतजी बजाज यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम घेण्यात आला. Workshop on ‘ICT and PowerPoint Presentation’

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमकांत वाकडे होते तर प्रमुख पाहुण्या म्हणून प्रा. उज्वला एस. नवले, मारिया अध्यापक महाविद्यालय, चंद्रपूर यांनी उपस्थिती लावली.

कार्यशाळेत मार्गदर्शक प्रा. उज्वला एस. नवले यांनी बी.एड. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन कसे तयार करावे, त्यासाठी आवश्यक बाबी कोणत्या आहेत, तसेच प्रभावी सादरीकरणासाठी स्लाइड्सचा वापर कसा करावा, याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. हेमकांत वाकडे यांनी बी.एड. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी अध्यापन पद्धतीत पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनचे महत्त्व स्पष्ट केले. आधुनिक शिक्षणपद्धतीत माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केल्यास अध्यापन अधिक परिणामकारक होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. तसेच विविध शैक्षणिक क्षेत्रांत आय.सी.टी.चा वापर कसा केला जातो, याची माहितीही त्यांनी दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आयोजन प्राध्यापिका वनिता हलके यांनी केले. सूत्रसंचालन मोनाली मुंडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन समीक्षा निंबड, बी.एड. द्वितीय वर्षाच्या छात्राध्यापिका यांनी केले.

कार्यशाळेला प्राध्यापिका डॉ. जयमाला घाटे, प्राध्यापिका डॉ. प्रगती बच्चूवार, प्राध्यापिका सुचिता खोब्रागडे, प्राध्यापिका अश्विनी सातपुंडके, प्राध्यापिका शमिना अली, प्राध्यापक राजकुमार भगत, ग्रंथपाल चंदन जगताप, शिक्षकेतर कर्मचारी मोरेश्वर गाडगे, विजय बाळबुधे यांच्यासह बी.एड. द्वितीय वर्षाचे विद्यार्थी उपस्थित होते.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular