Monday, July 13, 2026
HomeCulturalबॅ. राजाभाऊ खोब्रागडे सभागृह सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले करा

बॅ. राजाभाऊ खोब्रागडे सभागृह सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले करा

Open Barrister Rajabhau Khobragade Auditorium at Babupeth to the general public

बाबूपेठ येथील बॅ. राजाभाऊ खोब्रागडे सभागृह नूतनीकरणाची मागणी
पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) कडून आयुक्तांना निवेदन; मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

चंद्रपूर :- बाबूपेठ प्रभागातील बॅ. राजाभाऊ खोब्रागडे सभागृहाचे तात्काळ नूतनीकरण करून ते सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले करण्यात यावे, अशी मागणी पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) जिल्हा शाखा, चंद्रपूरच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त अकुनूरी नरेश यांना निवेदन सादर करण्यात आले. Open Barrister Rajabhau Khobragade Auditorium to the general public

बाबूपेठ येथील बॅ.राजाभाऊ खोब्रागडे सभागृह हे सामाजिक, शैक्षणिक व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी महत्त्वाचे केंद्र असून, सध्या त्याची अवस्था जीर्ण झाल्याने नागरिकांना त्याचा योग्य लाभ घेता येत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे तातडीने दुरुस्ती व नूतनीकरणाची कामे हाती घेऊन सभागृह जनतेसाठी खुले करावे, अशी मागणी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

या प्रसंगी महेंद्र खंडाळे (जिल्हाध्यक्ष, PPID), नभा वाघमारे (जिल्हाध्यक्ष, PPID महिला विंग), मिलिंद खोब्रागडे (महासचिव, PPID) तसेच संदीप वाघमारे (केंद्रीय कार्यकारिणी सदस्य, पीपल्स युथ फ्रंट) आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सदर मागणी लवकरात लवकर मान्य करून कार्यवाही न केल्यास पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. नागरिकांच्या हितासाठी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular