Wednesday, September 16, 2026
HomeAccidentमुसळधार पावसामुळे आज 30 रोजी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

मुसळधार पावसामुळे आज 30 रोजी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

मुसळधार पावसामुळे आज शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

चंद्रपूर :- पावसाचा वाढता जोर आणि हवामान विभागाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना आज, 30 जुलै 2026 (गुरुवार) रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने याबाबत अधिकृत माहिती दिली असून, विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक संस्थांनी या आदेशाची अंमलबजावणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचणे, नाले-ओढ्यांना पूर येणे तसेच वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रशासनाने नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नये, पूरग्रस्त किंवा धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे तसेच स्थानिक प्रशासनाने जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन केले आहे.

जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांनी या आदेशाचे पालन करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular