Monday, September 14, 2026
HomeMaharashtraगडचिरोलीत ‘छात्रो की गुंज’ची महा मॅरेथॉन

गडचिरोलीत ‘छात्रो की गुंज’ची महा मॅरेथॉन

गडचिरोली : काँग्रेसचे नेते तथा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रो की गुंज’ या उपक्रमातून प्रेरणा घेऊन, खासदार डॉ. नामदेव जी. किरसान यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली येथे ॲड. दुष्यंत नामदेव किरसान मित्रपरिवाराच्या वतीने भव्य महा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‘Chhatro Ki Gunj’ Mega Marathon in Gadchiroli

या मॅरेथॉन स्पर्धेला गडचिरोलीसह चंद्रपूर, भंडारा, गोंदिया तसेच संपूर्ण विदर्भातील युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दहा हजारांहून अधिक युवक-युवतींनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. युवकांमध्ये आरोग्य, क्रीडा आणि सकारात्मक ऊर्जेची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, ॲड. दुष्यंत नामदेव किरसान यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रसिद्ध वक्ते प्रा. डॉ. विनोद बाबर यांच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधी, स्पर्धा परीक्षा आणि भविष्यातील शैक्षणिक वाटचालीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमादरम्यान खासदार डॉ. नामदेव जी. किरसान यांनीही दूरदृष्टी प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षांची तयारी, उपलब्ध शैक्षणिक संधी आणि भविष्यातील करिअरच्या दृष्टीने नियोजन कसे करावे, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही या संवादाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

तसेच, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गडचिरोली येथे मोफत अभ्यासिकेचे लोकार्पण यावेळी करण्यात आले. या अभ्यासिकेमुळे ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होणार असून, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लागणार आहे.

या प्रसंगी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, ॲड. दुष्यंत नामदेव किरसान,माजी जि. पं. उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, आदिवासी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव सौं. कुसुमताई अलाम,
अ‍ॅड. सौं. कविता मोहरकर,
नगरसेवक सतीश विधाते, कुरखेडा तालुकाध्यक्ष जीवन पाटील नाट, चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, तालुकाध्यक्ष गडचिरोली वसंत राऊत, धानोरा तालुका अध्यक्ष प्रशांत कोराम, देसाईगंज तालुका अध्यक्ष राजेंद्र बुल्ले, आरमोरी तालुकाध्यक्ष आरमोरी मिलिंद खोब्रागडे, पर्यावरण सेल जिल्हाध्यक्ष राजेश ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष नेताजी गावतुरे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव सलोटकर, जिल्हाध्यक्ष आदिवासी काँग्रेस माधव गावड, पर्यावरण विभाग जिल्हाध्यक्ष राजेश ठाकूर, मनोज ढोरे,विजय पाटील गावंडे, दिवाकर निसार, जिल्हाध्यक्ष शिक्षक विभाग दत्तात्रय खरवडे, उत्तम ठाकरे, विजय लाड,हरबाजी मोरे, ढीवरू मेश्राम, योगेंद्र झंजाड, राहुल भांडेकर, महेंद्र लटारे, जावेद खान सह पदाधिकारी, पत्रकार बंधू, युवक व युवती मोठया संख्येने उपस्थित होते.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular