Friday, October 23, 2026
HomeDistrict Collectorचंद्रपूर जिल्ह्यात दुपारी २ वाजेपर्यंत ४२.५२ टक्के

चंद्रपूर जिल्ह्यात दुपारी २ वाजेपर्यंत ४२.५२ टक्के

चंद्रपूर :- नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी, २३ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया सुरू असून, चंद्रपूर येथील तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर जिल्हाधिकारी वसूमना पंत आणि जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे यांनी मतदानाचा हक्क बजावला. Graduate Constituency Election

लोकशाही प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा असलेल्या या निवडणुकीत पदवीधर मतदार मतदानासाठी पुढे येत आहेत. जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मतदान केल्याने निवडणूक प्रक्रियेतील सहभागाचे महत्त्व अधोरेखित झाले.

दरम्यान, दुपारी २ वाजेपर्यंतच्या मतदानाच्या आकडेवारीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण ३२ हजार २६२ मतदारांपैकी १३ हजार ७१८ मतदारांनी मतदान केले. यामध्ये ९ हजार ३८८ पुरुष आणि ४ हजार ३३० महिला मतदारांचा समावेश आहे. त्यानुसार जिल्ह्यात दुपारी २ वाजेपर्यंत ४२.५२ टक्के मतदान झाले होते.

जिल्ह्यात एकूण ५८ मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular