Wednesday, October 21, 2026
HomeCulturalसलग १४ वर्षांपासून सुरू असलेल्या 'भाऊंचा दांडिया'ची यशस्वी सांगता

सलग १४ वर्षांपासून सुरू असलेल्या ‘भाऊंचा दांडिया’ची यशस्वी सांगता

चंद्रपूर :- विदर्भातील सर्वात मोठा आणि चंद्रपूरकरांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या ‘भाऊंचा दांडिया’ या महोत्सवाची सलग १४ व्या वर्षी अत्यंत थाटामाटात आणि उत्साही वातावरणात यशस्वी सांगता झाली. दिवंगत खासदार स्व. बाळूभाऊ धानोरकर यांनी चंद्रपूरच्या सांस्कृतिक विश्वात आणि युवकांच्या हृदयात निर्माण केलेले हे व्यासपीठ आज एकतेचे आणि आपुलकीचे प्रतीक बनले आहे. या सांगता समारंभात पक्षाच्या सीमा ओलांडून आलेल्या विविध नेत्यांनी बाळूभाऊंच्या आठवणींना उजाळा देत भावूक उद्गार काढले. तसेच, त्यांचा हा वारसा अतिशय खंबीरपणे आणि कौशल्याने पुढे नेणाऱ्या खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतृत्वाचे व नियोजनाचे मनःपूर्वक कौतुक केले. Successful conclusion of ‘Bhau’s Dandiya’, an event held for 14 consecutive years

गटनेते महाराष्ट्र विधानसभा तथा आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले कि, “स्व. बाळूभाऊ धानोरकर यांनी युवकांना एकत्र आणण्यासाठी आणि संस्कृती जोपासण्यासाठी हे भव्य व्यासपीठ निर्माण करून दिले. हा केवळ दांडिया नसून विदर्भातील एकतेचा संदेश देणारा सर्वात मोठा उत्सव आहे. आज बाळूभाऊ आपल्यात नसले, तरी खासदार प्रतिभाताई धानोरकर त्यांचा हा सांस्कृतिक व सामाजिक वारसा अत्यंत अभिमानाने आणि उत्तम नियोजनासह पुढे घेऊन जात आहेत, हे पाहून मनाला मोठा आनंद होतो.”

आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले कि, “दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्यासोबत आमची राजकारणापलीकडची, घट्ट मैत्री होती. त्यांनी सुरू केलेल्या या दांडियामुळे संपूर्ण चंद्रपूर एकत्र येते. दिवसेंदिवस या महोत्सवाला मिळणारा प्रतिसाद आणि तरुणाईचा उत्साह वाढतच आहे. बाळूभाऊंनी लावलेल्या या रोपट्याला खासदार प्रतिभाताई धानोरकर त्याच आत्मविश्वासाने पुढे नेत आहेत, याचे मोठे समाधान वाटते.”

आमदार बंटी भांगडिया म्हणाले कि, “स्व. बाळूभाऊ धानोरकर हे कुठल्याही पक्षात असले, तरी आमचे त्यांच्याशी कौटुंबिक व जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांची आठवण दररोज मनाला स्पर्शून जाते. त्यांनी सुरू केलेली ही सुंदर परंपरा आज खासदार प्रतिभाताई धानोरकर तितक्याच आत्मियतेने पुढे चालवत आहेत, हे खरोखरच कौतुकास्पद आहे.”

आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, “मी स्व. बाळूभाऊंसोबत काम केले आहे. या दांडियाची व्याप्ती आणि लोकप्रियता दरवर्षी वाढतच चालली आहे. चंद्रपुरातील हजारो तरुणांसाठी हे एक हक्काचे व्यासपीठ बनले आहे. बाळूभाऊंनी दिलेला हा समृद्ध वारसा खासदार प्रतिभाताई धानोरकर पुढेही असाच समर्थपणे चालवतील, यात शंका नाही.”

माजी गृहराज्यमंत्री हंसराज अहिर म्हणाले कि, “दांडिया महोत्सवाने चंद्रपूरच्या सांस्कृतिक क्षेत्रात मोलाची भर घातली आहे. स्व. बाळूभाऊंनी युवकांसाठी आणि चंद्रपूरकरांसाठी ही एक मोठी पर्वणीच सुरू केली होती. आज खासदार प्रतिभाताई धानोरकर अत्यंत खंबीरपणे आणि निष्ठेने हा वारसा पुढे नेत असल्याचे पाहून खूप आनंद होत आहे.”

चंद्रपूरकरांच्या अलोट उत्साहात पार पडलेल्या या १४ व्या ‘भाऊंचा दांडिया’ महोत्सवाने पुन्हा एकदा स्व. बाळूभाऊ धानोरकर यांच्या आठवणींना ताजे केले. खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी उपस्थित सर्व नेते, नगरसेवक, नागरिक, युवक-युवती व आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular