Friday, October 9, 2026
HomeBussinessग्रामीण महिलांसाठी स्वयंरोजगाराची संधी

ग्रामीण महिलांसाठी स्वयंरोजगाराची संधी

चंद्रपूर :- ग्रामीण भागातील महिला व युवतींना कौशल्य प्रशिक्षण, स्वयंरोजगार आणि आर्थिक स्वावलंबनाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद, चंद्रपूरच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत सन 2026-27 या वर्षात विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘ग्रामसमृद्धी’ पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. Self-employment opportunity for rural women

महिला व बालकल्याण विभागामार्फत महिलांसाठी विविध कौशल्य प्रशिक्षण व उत्पन्नवाढीच्या योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. महिलांना कौशल्य प्रशिक्षण देणे, स्वयंरोजगारासाठी साधनसामग्री उपलब्ध करून देणे, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे तसेच मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे हा या योजनांचा प्रमुख उद्देश आहे.

या योजनेंतर्गत पात्र महिला व युवतींना त्यांच्या आवडीनुसार व गरजेनुसार विविध कौशल्याधारित प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक कौशल्ये, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळणार आहे. परिणामी ग्रामीण भागातील महिलांच्या रोजगारक्षमतेत वाढ होऊन त्यांना आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करता येईल.

योजनेची अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान करण्याच्या दृष्टीने 1 सप्टेंबर 2026 पासून gramsamruddhi.in/wcdscheme हे स्वतंत्र ऑनलाइन पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे. या पोर्टलवर योजनांची माहिती, पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे आणि ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

पात्र व इच्छुक महिला आणि युवतींनी पोर्टलवर उपलब्ध असलेल्या योजनांची माहिती काळजीपूर्वक वाचून, पात्रता निकष तपासून आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज करावा. ग्रामीण भागातील जास्तीत जास्त महिलांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आले आहे. ‘Gramsamruddhi’ portal.

महिला सक्षमीकरणाला चालना : महिलांना कौशल्य विकासाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे हे जिल्हा परिषदेचे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार असून, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासाला चालना मिळणार आहे.

जिल्ह्यातील पात्र महिला व युवतींनी ‘ग्रामसमृद्धी’ पोर्टलचा लाभ घेऊन योजनांसाठी अर्ज करावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी केले आहे.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular