Sunday, September 13, 2026
HomeCulturalसंस्कृतीचे जतन करतानाच समाजहिताचा संदेश देणारी नवी घडवा

संस्कृतीचे जतन करतानाच समाजहिताचा संदेश देणारी नवी घडवा

चंद्रपूर :- तान्हा पोळा हा आपल्या समृद्ध कृषी आणि सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे. अशा पारंपरिक सणांच्या माध्यमातून बालगोपाळांना आपल्या संस्कृतीची ओळख होण्यासोबतच त्यांच्यामध्ये सामाजिक भान आणि सर्जनशीलतेची जाणीव निर्माण होते. Tanha Bail Pola आजच्या लाकडी बैल सजावट स्पर्धेत बालगोपाळांनी विविध सामाजिक संदेश देत आपल्या कलागुणांचे दर्शन घडविले आहेण् संस्कृतीचे जतन करतानाच समाजहिताचा संदेश देणारी ही नवी पिढी घडणे ही अभिमानाची बाब आहे असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

   चंद्रपूर येथील संजय नगर परिसरात तान्हा पोळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लाकडी बैल सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत परिसरातील बालगोपाळांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत नंदी बैलांची आकर्षक सजावट केली. पारंपरिक सजावटीसोबतच बालगोपाळांनी विविध सामाजिक विषयांवर आधारित संदेश आपल्या सजावटीतून मांडले. त्यामुळे हा उपक्रम उपस्थित नागरिकांसाठी विशेष आकर्षण ठरला

            या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाच्या महामंत्री सविता दंढारेनगर सेविका आशा देशमूखचंद्रशेखर देशमूखरामचंद्र खापनेअशोक मुडपल्लीवारहरि शेंडेशांताराम कुरेकरअरुन डंभारेरमेश केदारआसाराम रघोटेसत्यनारायन पदमावारसंजय चिन्नेवारदशरथ खामनकरअनिल चामचोरगोलु खापने आदिंची उपस्थिती होती.

  यावेळी बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले कीतान्हा पोळा हा केवळ मनोरंजनाचा किंवा स्पर्धेचा कार्यक्रम नसून आपल्या संस्कृतीशी आणि शेतकरी जीवनाशी जोडलेली परंपरा आहे. बैल हा शेतकर्याच्या जीवनातील महत्त्वाचा घटक असून त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना या सणामागे आहे. ही परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन होणे गरजेचे आहे.

           बालगोपाळांनी लाकडी बैल सजवून त्यातून स्वच्छतापर्यावरण संवर्धनपाणी बचतशिक्षणसामाजिक एकोपा आणि समाजातील विविध प्रश्नांबाबत जनजागृती करणारे संदेश दिले. लहान वयातच मुलांना सामाजिक विषयांची जाणीव होणे ही सकारात्मक बाब आहे. त्यांच्या कल्पकतेला आणि कलागुणांना प्रोत्साहन देणे ही समाजाची जबाबदारी असून अशा उपक्रमांना सातत्याने पाठबळ दिले पाहिजेअसेही आमदार जोरगेवार यांनी सांगितले.

  आपल्या सण उत्सवांमध्ये आधुनिकतेसोबतच सामाजिक संदेशांची जोड दिल्यास त्यातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडू शकते बालगोपाळांच्या माध्यमातून हे संदेश नागरिकांपर्यंत पोहोचत असून भविष्यातही संस्कृती परंपरा आणि सामाजिक बांधिलकी जपणारे विविध उपक्रम राबविण्यासाठी सहकार्य केले जाईल असे आमदार जोरगेवार यांनी यावेळी सांगितले.

  कार्यक्रमात लाकडी बैल सजावट स्पर्धेत सहभागी झालेल्या बालगोपाळांचे कौतुक करण्यात आलेण् यावेळी परिसरातील नागरिकपालकबालगोपाळ तसेच आयोजक मोठ्या संख्येने उपस्थित होतेतान्हा पोळ्याच्या निमित्ताने संजय नगर परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular