Friday, September 11, 2026
HomeAgricultureघोडपेठ येथे बैलजोडी सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

घोडपेठ येथे बैलजोडी सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

चंद्रपूर :- भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहीर यांच्या विशेष पुढाकाराने दरवर्षीप्रमाणे यंदाही दि. 10 सप्टेंबर 2026 रोजी भारतीय जनता पार्टी, घोडपेठच्या विद्यमाने शेतकऱ्यांचा आनंददायी आणि परंपरेचा सण असलेल्या बैल पोळा निमित्त भव्य बैलजोडी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. Bullock pair decoration competition at Ghodpeth

उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळ स्पर्धेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

        राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे पूर्व अध्यक्ष तथा पुर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराजजी अहीर Hansraj Ahir यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमास सर्वश्री. हरीश्चंद्रजी अहीर, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे, भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रकाश देवतळे, चंद्रपूरचे माजी उपमहापौर अनिल फुलझेले, भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, मोहन चौधरी, श्यामल अहीर, चंदन अहीर, कमल कजलीवाले, पूनम तिवारी, गौतम यादव, माजी जि.प. सदस्य विजय वानखेडे, विनोद घुगुल, देवदत्त लोहे, विलास खडके, केशव लांजेवार, विश्वनाथ निमकर, अर्जुन लांजेवार, विमलताई निमकर, परीक्षक सुरज दुर्गे, संजय घुगुल यांचेसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

                उपस्थित शेतकरी बांधवांना हंसराज अहीर यांनी बैल पोळ्याच्या शुभेच्छा दिल्या. हा पारंपारीक सोहळा निरंतरपणे कायम राहण्याकरिता शेतकरी बांधवांनी पशुपालनातून गौरक्षणाचे संरक्षण व संवर्धन करून देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे आवाहन केले. रघुवीर अहीर, रविंद्र शिंदे, अनिल धानोरकर व अन्य मान्यवरांनी सुध्दा समयोचित मार्गदर्शन केले.

                बैल पोळ्यानिमित्त बैलजोड्यांची देखणी सजावट करण्यात आली. हंसराज अहीर, रविंद्र शिंदे, अनिल धानोरकर, रघुवीर अहीर यांनी या स्पर्धेत सहभागी झालेल्या विजेत्या बैलजोडी मालकांचे प्रथम क्रमांक मारोती तेलमुले, द्वितीय क्रमांक अरूण मिलमिले, तृतीय क्रमांक राजु रासेकर, चतुर्थ क्रमांक संतोष पोडे, रमेश जोगी, वैभव निमकर, ईश्वर चिडे स्थानांपर्यंतच्या बैलजोडी मालकांचा शाल, स्मृतीचिन्ह व रोख राशी देऊन सन्मान केला व स्पर्धेत सहभागी सर्व बैलजोडी मालकांना प्रोत्साहनपर भेटवस्तु देऊन गौरविण्यात आले. पोळा हा शेतकऱ्यांचा सण असून बैलांचा सन्मान करण्याचा दिवस आहे. या पारंपारिक उत्सवात समाजातील सर्व घटकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभल्यामुळे कार्यक्रम यशस्वी झाला.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular