गडचिरोली :- सामाजिक कार्यकर्ते प्रविण चन्नावार यांच्या कन्या इंजिनिअर जान्हवी प्रविण चन्नावार यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू व गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यासोबतच विद्यार्थ्यांना खाऊचेही वितरण करण्यात आले.
वाढदिवसानिमित्त केक, पार्टी व अनावश्यक खर्च करण्याऐवजी त्याच खर्चातून गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्याचा उपक्रम चन्नावार कुटुंबीयांकडून राबविण्यात आला. दरवर्षी वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संकल्प यंदाही कायम ठेवण्यात आला.
शिक्षण हे सामाजिक विषमता व गरिबी दूर करण्याचे प्रभावी माध्यम आहे. आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होऊ नयेत, या उद्देशाने शैक्षणिक साहित्याची मदत करण्यात आली. साहित्य मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद हा या उपक्रमाचा खरा उद्देश असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
स्वतःच्या वाढदिवसाचा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता गरजू विद्यार्थ्यांसोबत वाटून इंजि. जान्हवी चन्नावार यांनी समाजासमोर प्रेरणादायी आदर्श ठेवला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे विद्यार्थी, पालक व नागरिकांकडून कौतुक होत आहे.
