Friday, July 31, 2026
HomeCrimeछत्तीसगड येथून घरफोडीचा आरोपी जेरबंद

छत्तीसगड येथून घरफोडीचा आरोपी जेरबंद

चंद्रपूर :- चंद्रपूर शहरातील कार्यालयातून तब्बल ₹६ लाखांची रोकड चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला LCB स्थानिक गुन्हे शाखेने छत्तीसगड राज्यातून जेरबंद करत चोरीतील ₹३ लाखांची रोकड हस्तगत केली आहे. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि कसून तपासाच्या आधारे करण्यात आलेल्या या धडक कारवाईमुळे चंद्रपूर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. Burglary suspect arrested in Chhattisgarh

फिर्यादी राकेश अवघडे (वय ४४, रा. डी.एस.के. ग्रीन कॉलनी, दाताळा, चंद्रपूर) यांनी त्यांच्या बसस्थानकाजवळील पॅलेस हॉटेलच्या मागे असलेल्या कार्यालयातून अज्ञात चोरट्याने ₹६ लाखांची रोकड चोरी केल्याची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या तक्रारीवरून रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९५६/२०२६ भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ३३१(४) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता. Chandrapur Police

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली. पथकाने घटनास्थळावरील पुरावे, सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन तसेच गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. Chandrapur Local Crime Branch

तपासादरम्यान संशयित बलेश कुमार हल्बा उर्फ बुवारीया (वय ३८, रा. रंगकोहरा, पोस्ट डोंगरगाव, जि. राजनांदगाव, छत्तीसगड) याचा शोध लागला. त्यानंतर पोलिसांनी छत्तीसगडमध्ये जाऊन त्याला शिताफीने ताब्यात घेतले.
ताब्यात घेतल्यानंतर आरोपीकडे सखोल व कसून चौकशी करण्यात आली.

चौकशीदरम्यान त्याने २७ जुलै २०२६ रोजी चंद्रपूर शहरातील बसस्थानक परिसरातील कार्यालयातून ₹६ लाखांची रोकड चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पंचांसमक्ष आरोपीच्या ताब्यातून चोरीतील ₹३ लाखांची रोकड जप्त करण्यात आली. चोरीतील उर्वरित रकमेचा शोध सुरू असून आरोपीला पुढील तपास व कायदेशीर कारवाईसाठी रामनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल कावरे यांच्या नेतृत्वात सपोनि योगेश हिवसे, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनील गोरकर, पोहवा सतीश अवथरे  इमरान खान,  लल्लू यादव, संदीप, हिरालाल गुप्ता, पोशि किशोर वाकडे आणि पोशि शशांक बदाम यांनी पार पाडली.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular