Wednesday, June 3, 2026
HomeMLAपात्र लाभार्थीच्या घरकुलांची कामे रखडली

पात्र लाभार्थीच्या घरकुलांची कामे रखडली

Construction of houses for eligible beneficiaries has been stalled, take immediate action

चंद्रपूर :- प्रधानमंत्री आवास योजना सन-२०२४-२५ मध्ये जिल्ह्यात हजारो गोर-गरीब गरजू लाभार्थाना घरकुल मंजुर आहेत. घरकुलाची कामे सुरू करण्यासाठी पहिला हप्ता वितरित करण्यात येत आहे. मात्र मंजुर पात्र लाभार्थापैकी अनेक लाभार्थाचे गेली बरेच दिवसापासून अकाऊंट वेरीफीकेशन असून सुद्धा पंचायत समिति स्तरावर ऑर्डर शीट ला नाव दिसत नसल्याने लाभार्थाना प्रथम हप्ता वितरित करण्यास अडचणीचे ठरत असल्याचे निदर्शनास येते. Construction of houses for eligible beneficiaries has been stalled

त्यामुळे सदर गंभीर बाब लक्षात घेऊन पात्र लाभार्थ्यांना तातडीने शासकीय मदत मिळवून देण्यात यावी अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांनी जिल्हा प्रकल्प संचालक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

घरकुल पात्र लाभार्थीची यादी आपले कार्यालयास पंचायत समिति स्तरावरून आपणाकडे पाठविण्यात आली आहे. आधीच घरकुलाची कामे सुरू करण्यास विलंब झालेला आहे. अनेक लाभार्थीनी घरकुल मंजुर झाल्याने आपली जुनी घरे काढून जागा खाली केली आहे. त्यामुळे पावसाळ्यात घराअभावी गोर-गरीब लाभार्थाचे हाल होणार आहेत. ही गंभीर बाब लक्षात घेऊन सदर तांत्रिक अडचनिचे तात्काळ निराकरण करण्याच्या दृष्टीने आपले स्तरावरून कार्यवाही करण्यात येऊन ज्या लाभार्थाचे Account Verify आहेत. मात्र Order Sheet ला नाव दिसत नसल्याने घरकुलाची कामे रेंगाळलेली आहेत.

तरी अशा लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरित करून घरकुल बांधकामास सुरुवात करण्याबाबतचे निर्देश तात्काळ देण्यात यावे अशी मागणी चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे Former MLA Subhash Dhote यांनी प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा DRDO चंद्रपूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular