Saturday, April 18, 2026
HomeMaharashtraदिवंगत खा. बाळुभाऊ धानोरकर यांच्या द्वितीय पुण्यस्मरण सोहळ्याचे वरोरा येथे आयोजन

दिवंगत खा. बाळुभाऊ धानोरकर यांच्या द्वितीय पुण्यस्मरण सोहळ्याचे वरोरा येथे आयोजन

second memorial service of late MP Balubhau Dhanorkar was organized in Warora

चंद्रपूर :- चंद्रपूर -वणी -आर्णी लोकसभा क्षेत्रात राजकीय आणि सामाजिक जीवनात आपल्या कार्याने आणि व्यापक जनसंपर्काने एक वेगळे स्थान निर्माण करणारे दिवंगत खासदार बाळुभाऊ धानोरकर Late MP Balu Dhanorkar यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांना आदरांजली वाहण्यासाठी ‘आठवणीतले बाळूभाऊ’ पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

बाळुभाऊ धानोरकर यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी केलेल्या योगदानाला सलाम करण्यासाठी आयोजित हा सोहळा, शुक्रवार, दिनांक ३० मे २०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजता शगुन हॉल, वणी बायपास रोड, वरोरा येथे होणार आहे. हा कार्यक्रम बाळुभाऊंच्या आठवणींना उजाळा देण्यासोबतच त्यांच्या आदर्श कार्याची प्रेरणा घेण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. The second memorial service of late MP Balubhau Dhanorkar was organized in Warora

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा आमदार नानाभाऊ पटोले हे असतील.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत, ज्यात खासदार प्रतिभाताई धानोरकर, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराजजी अहिर, खासदार नामदेवराव किरसान, माजी मंत्री तथा आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार, आमदार सुधाकर अडबाले, आमदार अभिजीत वंजारी, आमदार किर्तीकुमार भांगडीया, आमदार किशोर जोरगेवार, आमदार करण देवतळे, आमदार देवराव भोंगळे, आमदार संजय देरकर, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी आमदार वामनराव कासावार, तसेच काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे यांचा समावेश आहे.

यावेळी विशेष उपस्थिती म्हणून माजी आमदार वामनराव चटप, माजी आमदार संजय धोटे, माजी आमदार संजीवरेड्डी बोदुकलवार, माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी आमदार विश्वास नांदेकर, राष्ट्रवादी काँग्रेस (श.प. गट) जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, शिवसेना (उबाठा) जिल्हाध्यक्ष संदिप गिहे, मनसे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, राष्ट्रवादी काँग्रेस चंद्रपूर जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, शिवसेना (उबाठा) जिल्हाध्यक्ष रविंद्रजी शिंदे, शिवसेना (शिंदे गट) जिल्हाध्यक्ष नितीनजी मत्ते आणि मनसे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मनदीप रोडे हे उपस्थित राहतील.

बाळुभाऊ धानोरकर मित्र परिवाराने चंद्रपूर-वणी -आर्णी लोकसभा क्षेत्रातील सर्व नागरिक, कार्यकर्ते आणि हितचिंतकांना या कार्यक्रमास उपस्थित राहून दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांना आदरांजली वाहण्याचे आणि त्यांच्या स्मृतींना वंदन करण्याचे आवाहन केले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular