Wednesday, June 3, 2026
HomeHealthनांदगाव (पोडे) येथे विशेष आरोग्य तपासणी शिबीर

नांदगाव (पोडे) येथे विशेष आरोग्य तपासणी शिबीर

Special health check-up camp at Nandgaon Pode

चंद्रपूर :- बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोडे) येथे.दिनांक 14-5-2025 बुधवार रोजी ज्येष्ठ नागरिक सेवा व सुश्रुषा कार्यक्रम, चंद्रपूर प्रकल्प अंतर्गत जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान, चंद्रपूर, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) तथा नांदगाव (पोडे) ग्रामपंचायत यांचा संयुक्त विद्यमाने विशेष आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. Special health check-up camp at Nandgaon
याप्रसंगी आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे येथील तज्ञ डॉक्टरांची टीम आरोग्य तपासणी करिता उपस्थित होते. यामध्ये मेडिसिन तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, सर्जरी तज्ञ, स्त्रिरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, अस्थिरोग तज्ञ व त्वचारोग तज्ञ या तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती होती.

नांदगाव (पोडे) येथील नागरिकांनी मोठ्या संख्येने आरोग्य तपासणी केले आवश्यकतेनुसार नागरिकांचे बीपी, शुगर व ईसीजी तपासणी करण्यात आले. एकूण 230 नागरिकांनी आरोग्य तपासणी केली. यामधील 24 रुग्णाला पुढील उपचाराकरिता आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) येथे रेफरल करण्यात आले.
शिबिरात प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले कविता वैद्य (सरपंच), मल्लेशजी कोडारी (उपसरपंच), डॉ. प्रशांत मांडरे (CHO, उपकेंद्र नांदगाव), डॉ. प्राजक्ता इंगोले (प्रोग्राम मॅनेजर, ज्येष्ठ नागरिक सेवा व सुश्रुषा कार्यक्रम, चंद्रपूर), मनोज सोदारी सहायक प्रोग्राम मॅनेजर, ज्येष्ठ नागरिक सेवा व सुश्रुषा कार्यक्रम, चंद्रपूर, गंगाधर तळस (वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते, सावंगी मेघे) यांची उपस्थिती होती.
शिबिराला यशस्वी करण्याकरिता लालाजी उईके (सामाजिक कार्यकर्ते), अविनाश आत्राम (रोजगार सेवक), शालिकजी दरेकर (ज्येष्ठ नागरिक), गावातील आशा वर्कर, CRP, सुभाष तेलतुमडे  (तालुका समन्वयक, ज्येष्ठ नागरिक सेवा व सुश्रुषा कार्यक्रम, चंद्रपूर), सावंगी मेघे येथील टीम व गावातील कार्यकर्ते यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular