सलग सहाव्यांदा इतिहास! PM SHRI सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय, मनपा चंद्रपूरचा NMMS 2026 मध्ये विक्रमी 33 विद्यार्थी उत्तीर्ण
चंद्रपूर :- चंद्रपूर शहरातील PM SHRI सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय, मनपा चंद्रपूरने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी घेण्यात येणाऱ्या NMMS परीक्षा 2026 मध्ये दैदिप्यमान यश संपादन करत सलग सहाव्यांदा इतिहास रचला आहे. यंदा तब्बल 33 विद्यार्थी उत्तीर्ण होत शाळेने आतापर्यंतचा सर्वाधिक निकाल नोंदवला आहे.
गुणवत्ता यादीत स्थान मिळालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला सुमारे ₹48,000/- शिष्यवृत्ती मिळणार असून त्यामुळे त्यांच्या पुढील शिक्षणासाठी भक्कम आर्थिक आधार निर्माण होणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती मोठी संजीवनी ठरणार आहे.
नियोजनबद्ध मार्गदर्शनाचे फळ
या उल्लेखनीय यशामागे शाळेचे मुख्याध्यापक शिवलाल इरपाते, वर्गशिक्षक मंगेश अंबादे, विषय शिक्षक जोगेश्वर मोहारे, सोनाली कासुलकर यांचे नियोजनबद्ध मार्गदर्शन, सातत्यपूर्ण परिश्रम आणि विद्यार्थ्यांप्रती असलेले समर्पण महत्त्वाचे ठरले. विद्यार्थ्यांची जिद्द, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा सक्रिय पाठिंबा या त्रिसूत्रीमुळेच हे यश शक्य झाले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये
पूर्वी बारसागडे, आकांक्षा नंदेश्वर, अनुष्का देशकर, शर्वरी शेंडे, क्रिया बारसागडे,
ओम श्रीकोंडावार
आकांक्षा नंदेश्वर
अनुष्का देशकर
शर्वरी शेंडे
रोशनी मजुमदार
दीक्षा अधिकारी
पूर्वी बारसागडे
राजश्री वालकुंटेवार
आराधना भोयर
क्रिया बारसागडे
कल्याणी किरमे
अवनी थूल
सुकेशनी जुमडे
गार्गी नंदेश्वर
वेदांती पेंदोर
गौरी क्षीरसागर
प्रिया जुनघरे
मृण्मयी आवारी
रेवन हेडाऊ
श्रीनिवास मिरेवाड
उदयन शेंडे
क्रिश रायपुरे
श्रेयस इदे
आराध्य कसारे
नैतिक कजले
सोहम मडावी
सुजित नागापुरे
वंश भट
कबीर जुलमे
धीरज जयपुरकर
कृष्णा पंच
गोलू राजपूत
रुद्रपती मैंद
या अभूतपूर्व यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली असून परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.