Saturday, May 30, 2026
HomeCulturalमहाशिवरात्री निमित्त सिद्धेश्वर मंदिरात भक्तांची उसळली गर्दी

महाशिवरात्री निमित्त सिद्धेश्वर मंदिरात भक्तांची उसळली गर्दी

महाशिवरात्री निमित्त सिद्धेश्वर मंदिरात भक्तांची उसळली गर्दी : काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी भक्तिभावाने घेतले दर्शन.

राजुरा :– महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वानिमित्त राजुरा तालुक्यातील देवाडा येथील सिद्धेश्वर मंदिर येथे भक्तिमय वातावरणात भगवान महादेवांचे दर्शन घेण्यात आले. यावेळी येथे भक्तजनांची मोठी गर्दी उसळली होती. या प्रसंगी चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार मा. श्री. सुभाषभाऊ धोटे यांनी मंदिरात उपस्थित राहून भगवान महादेवांचे विधीवत पूजन केले व जिल्ह्यातील सर्वसामान्य, गोरगरीब जनतेच्या सुख-समृद्धी, आरोग्य आणि कल्याणासाठी प्रार्थना केली.

महाशिवरात्रीच्या निमित्ताने मंदिर परिसरात भक्तांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. हर हर महादेवच्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले होते. या प्रसंगी अनेक भाविक, स्थानिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. भगवान महादेवांच्या कृपेने जिल्ह्यात सुख-शांती, प्रगती आणि ऐक्य नांदो, हीच प्रार्थना व्यक्त करण्यात आली.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular