Wednesday, October 21, 2026
HomeUncategorizedक्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या बलिदानाचे स्मरण ठेऊन राष्ट्रसेवेत योगदान द्यावे

क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या बलिदानाचे स्मरण ठेऊन राष्ट्रसेवेत योगदान द्यावे

क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या बलिदानाचे स्मरण ठेऊन राष्ट्रसेवेत योगदान द्यावे – हंसराज अहीर

क्रांतिवीर योध्द्यास शहीददिनी विनम्र अभिवादन

 

चंद्रपूर :- 1857 च्या स्वातंत्र्य लढ्यातील महान क्रांतिकारक योध्दा क्रांतिवीर बाबुराव पुल्लेसूर शेडमाके यांच्या बलिदान (शहीद) दिनानिमित्त दि. 21 ऑक्टोंबर 2026 रोजी चंद्रपूर येथील जिल्हा कारागृह परिसरातील शहीद स्मारक येथे या क्रांतिवीरास अभिवादन करून श्रध्दांजली वाहण्यात आली.

                राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके, पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार, आर्णीचे आमदार राजु तोडसाम, चंद्रपूर मनपाच्या महापौर संगिताताई खांडेकर, मनपा गटनेते शेखर शेट्टी, युवा नेते रघुवीर अहीर, शहीद बाबुराव शेडमाके स्मारक समितीचे सर्वश्री. विलास मसराम, गणेश गेडाम, भैय्याजी उईके, नगरसेवक जितेश कुळमेथे, कमलेश आत्राम, विठ्ठल कुमरे, भोला मडावी, राजेंद्र दुर्वे, शंकर उईके, शाम गेडाम, दिवाकर मेश्राम, नथ्थु गेडाम, विरेंद्र कुमरे, अनिल सिडाम यांचेसह कार्यक्रमास अनेकांची उपस्थिती होती.

                याप्रसंगी हंसराज अहीर यांनी वीर शहीद बाबुराव शेडमाके यांनी राष्ट्रासाठी दिलेल्या योगदान व बलिदानाचा उल्लेख करून त्यांनी ब्रिटीशांविरूध्द पुकारलेल्या बंडातून सर्व राष्ट्रभक्त नागरिकांनी प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. युवकांनी या महान योध्द्याच्या जीवनातून प्रेरणा घेऊन देशाच्या प्रगतीकरिता योगदान दिल्यास या क्रांतिवीरास खऱ्या अर्थाने श्रध्दांजली ठरेल असे विचार व्यक्त केले.

                आमदार किशोर जोरगेवार यांनीही क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या अतुलनीय शौर्याचा उल्लेख करून त्यांच्या बलिदानातून व अजरामर कार्याचे स्मरण ठेऊन प्रत्येकांनी राष्ट्र व जनसेवच्या कार्याला वाहून घ्यावे असे आवाहन केले.

                आमदार राजु तोडसाम यांनीही बाबुरावजी शेडमाके यांच्या जीवनावर विस्तृत भाष्य करून या शहीद स्मारक स्थळी क्रांतिवीर शेडमाकेंच्या पुतळ्याची स्थापना करण्याबाबत विचार मांडले. हा पुतळा सर्वांना सदैव प्रेरणा देत राहील व क्रांती लढ्याच्या स्मृती जपता येतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.

                चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी समाज बांधवांनी शहीद स्थळावर बहूसंख्येने उपस्थित होऊन या महान योध्द्याच्या शौर्य, त्याग आणि राष्ट्रभक्तीच्या स्मृतिंना अभिवादन करत श्रध्दांजली अर्पित केली. या कार्यक्रमास भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते सुध्दा मोठ्या संख्येत उपस्थित होते.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular