धोपटाळा येथील महिला खून प्रकरणाचा २४ तासांत उलगडा
एलसीबी व राजुरा पोलिसांची संयुक्त धडक कारवाई; तेलंगणातून आरोपीला बेड्या
महिला खून प्रकरणाचा २४ तासांत उलगडा
फिर्यादी यांना त्यांच्या सासऱ्यांनी फोनवरून माहिती दिली की शीतल कुंभारे या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या असून कोणतीही हालचाल करत नव्हत्या. त्यानंतर फिर्यादी तातडीने धोपटाळा येथे पोहोचले असता घराच्या मागील बाजूच्या खोलीत खाटेवर शीतल कुंभारे यांचा मृतदेह आढळला. अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने गळा चिरून त्यांचा खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले.
तांत्रिक तपास, गोपनीय माहिती आणि सायबर सेलच्या मदतीने तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात आली. तपासादरम्यान मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले व त्यांच्या पथकाने तेलंगणा राज्यातील मंचेरियाल जिल्ह्यातील रेपनपल्ली येथे धाड टाकून संशयित आरोपी राजेश व्यंकटी अड्टेला (वय ३५ वर्षे, रा. रेपनपल्ली, ता. चेनूर, जि. मंचेरियाल, तेलंगणा) याला ताब्यात घेतले.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार, स्थानिक गुन्हे शाखा (LCB), चंद्रपूर पो.नि. अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि. विनोद भुरले, पोउपनि. सर्वेश बेलसरे, पोउपनि. सुनील गौरकर, पोहवा सुभाष गोहेकार, किशोर वैरागडे, अजय बागरेस, सतिश अवथे, इम्रान खान, संतोष येलुलवार, गणेश मोहोडे, पोअं/हिरालाल गुप्ता, शेखर माघनकर, गोपीनाथ नरोटे, इशांक बादामवार, किशोर वाकोटे, चापोअं वृषभ बारसिंगो, चापोअं/गजानन मडावी तसेच पोलीस स्टेशन, राजुरा चे
R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
