Monday, September 21, 2026
HomeMLAग्रामीण भागातील संघटन मजबूत करून जनसेवेचा विस्तार करा

ग्रामीण भागातील संघटन मजबूत करून जनसेवेचा विस्तार करा

चंद्रपूर :- संघटन मजबूत, जनसेवा प्रभावी आणि विकासाचा संकल्प अधिक दृढ करण्यासाठी ग्रामीण भागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या प्रश्नांशी सातत्याने जोडलेले राहावे. पक्षाची ताकद ही केवळ निवडणुकीपुरती मर्यादित नसून सामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी संघटनेने सदैव सक्रिय राहणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील स्थानिक प्रश्न, नागरिकांच्या समस्या आणि विकासाच्या गरजा समजून घेत त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याची भूमिका कार्यकर्त्यांनी बजावावी, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
पांढरकवडा येथे भाजपाच्या तालुका ग्रामीण बैठकीची आयोजन करण्यात आीले होते. यावेळी ते बोलत होते. Strengthen the organization in rural areas and expand public service

या बैठकील भारतीय जनता पक्षाचे महामंत्री नामदेव डाहुले, महानगर माजी अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, तालुका अध्यक्ष विनोद खेवले, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष आशिष वाढई, महिला तालुका अध्यक्ष दुर्गा बावणे, तुषार सोम आदिंची प्रमूख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, ग्रामीण भागातील प्रत्येक गाव आणि प्रत्येक नागरिकापर्यंत पक्षाची संघटनात्मक ताकद पोहोचविणे आवश्यक आहे. गावपातळीवरील पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे पक्षाचे नागरिकांशी थेट जोडणारे महत्त्वाचे माध्यम आहेत. त्यामुळे नागरिकांच्या अडचणी जाणून घेणे, त्यांच्या प्रश्नांचा पाठपुरावा करणे आणि शासनाच्या विविध योजना व विकासकामांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे याला प्राधान्य दिले पाहिजे.

ग्रामीण भागातील स्थानिक प्रश्नांवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. पायाभूत सुविधा, नागरिकांच्या मूलभूत गरजा, विविध शासकीय योजनांचा लाभ आणि स्थानिक विकासकामांबाबत पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून सूचना मांडण्यात आल्या. स्थानिक पातळीवरील प्रश्नांची माहिती कार्यकर्त्यांकडून थेट मिळत असल्याने अशा बैठका संघटन आणि जनसेवा या दोन्ही दृष्टीने महत्त्वपूर्ण असल्याचे आमदार जोरगेवार यांनी सांगितले.

पक्षाचा ग्रामीण भागातील विस्तार अधिक व्यापक आणि मजबूत करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याची गरज आहे. प्रत्येक गावात संघटनात्मक बांधणी मजबूत करताना कार्यकर्त्यांनी नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवावा. पक्षाच्या माध्यमातून राबविण्यात येणारे विविध उपक्रम आणि शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, असेही आमदार जोरगेवार यांनी सांगितले.

बैठकीदरम्यान पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विविध सूचना व मते मांडली. त्यांच्या सूचना आणि विचार हे ग्रामीण भागातील संघटन अधिक सक्षम करण्यासाठी निश्चितच महत्त्वपूर्ण आहेत. आगामी काळात संघटनात्मक उपक्रमांना अधिक गती देत जनसेवा आणि विकासाच्या कामांना प्राधान्य देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

ग्रामीण भागातील संघटन अधिक मजबूत, जनसेवा अधिक प्रभावी आणि विकासाचा संकल्प अधिक दृढ करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रियपणे योगदान द्यावे, असे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी केले. बैठकीला ग्रामीण भागातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाजपाचे विविध स्तरावरील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular