Tuesday, September 15, 2026
HomeCulturalखासदार प्रतिभा धानोरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात श्री गणरायाचे उत्साहात आगमन

खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात श्री गणरायाचे उत्साहात आगमन

चंद्रपूर :- गणेशोत्सवानिमित्त येथील खासदार प्रतिभाताई धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांच्या वरोरा येथील जनसंपर्क कार्यालयात श्री गणरायाचे उत्साहात आगमन झाले. भक्तिमय वातावरणात विधिवत पूजा-अर्चा करून गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.

यावेळी परिसरात गणरायाच्या जयघोषाने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गणरायाचे दर्शन घेतले. याप्रसंगी मानस धानोरकर आणि पार्थ धानोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने जनसंपर्क कार्यालयात धार्मिक व सामाजिक उपक्रमांना सुरुवात झाली असून, गणरायाच्या आगमनाने कार्यकर्त्यांमध्येही उत्साह संचारला आहे.

यावेळी खासदार प्रतिभा धानोरकरांनी श्री गणरायाच्या चरणी सुख, समृद्धी आणि सर्वांच्या मंगलमय भवितव्यासाठी प्रार्थना केली.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular