Friday, July 31, 2026
HomeAccidentदाताळा पोद्दार स्कूल मार्गावरील खड्ड्यांवर शिवसेना आक्रमक

दाताळा पोद्दार स्कूल मार्गावरील खड्ड्यांवर शिवसेना आक्रमक

चंद्रपूर :- चंद्रपूर शहरातील दाताळा येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलकडे जाणारा मुख्य मार्ग सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत असून संपूर्ण रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले असतांना सततच्या पावसामुळे त्यात पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे दररोज या मार्गावरून जाणाऱ्या शेकडो विद्यार्थी, पालक, शिक्षक व नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची गंभीर बाब लक्षात घेवून शिवसेना चंद्रपूर तालुका प्रमुख तथा शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष दशरथ पारखी यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभाग क्र 1 चे कार्यकारी अभियंता पगारे व विभाग क्र 2 चे कार्यकारी अभियंता टांगले यांना निवेदनाद्वारे तात्काळ दुरुस्तीची मागणी केली. ShivSena takes a firm stand against potholes on the Datala-Poddar School road 6 लाखांच्या चोरीचा उलगडा, छत्तीसगड येथून आरोपी जेरबंद…..

पारखी यांच्या प्रमुख मागण्या:
1. पोद्दार स्कूलकडे जाणाऱ्या मुख्य मार्गाची तात्काळ पाहणी करून अहवाल सादर करावा.
2. रस्त्यावरील सर्व जीवघेणे खड्डे ७ दिवसांच्या आत तात्पुरते बुजवून वाहतूक सुरळीत करावी.
3. निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
4. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी या मार्गाचे दर्जेदार व टिकाऊ डांबरीकरण/काँक्रीटीकरण लवकरात लवकर करण्यात यावे. मनपा विरोधात नगरसेवक राहुल चौधरी यांचा अन्नत्याग इशारा…..

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असल्याने या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन कार्यवाही न केल्यास शिवसेना स्टाईलने जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला असून यावेळी युवाशक्ती ग्रामविकास संघटनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष योगेश मुऱ्हेकर व शिवसेना चंद्रपूर उप-तालुका प्रमुख विक्की महाजन यांची उपस्थिती होती.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular