चंद्रपूर / गडचिरोली :- पेपरफुटी प्रकरणी न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ काँग्रेस कमिटी, आरमोरी विधानसभा क्षेत्राच्या वतीने आमदार श्री रामदासजी मसराम यांच्या नेतृत्वात भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. Congress stages ‘Rasta Roko’ protest over NEET paper leak case
आंदोलनादरम्यान केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा तीव्र निषेध करण्यात आला.
आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, पेपरफुटीच्या घटनांना आळा बसावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी करत शासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.