Friday, July 24, 2026
HomeEducationalनीट पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करा

नीट पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करा

नागपूर विभागीय आयुक्तांमार्फत पंतप्रधानांना निवेदन

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची मागणी

चंद्रपूर : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक आणि वेळबद्ध चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने केली आहे. Conduct an impartial inquiry into the NEET paper leak

नाहीतर तो तिसऱ्यांदा मरेल… नीट पेपर लीक…..

या मागणीसंदर्भात संघाच्या वतीने आमदार सुधाकर अडबाले MLA Sudhakar Adbale व माजी आमदार व्हि. यू. डायगव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली नागपूर विभागीय आयुक्तांमार्फत भारताचे पंतप्रधान यांना आज २३ जुलै रोजी निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात देशातील स्पर्धा परीक्षांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. immediately seek the Union Education Minister’s resignation.

तसेच, नीट पेपरफुटी प्रकरणाची उच्चस्तरीय निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्थेत आवश्यक सुधारणा कराव्यात आणि विद्यार्थ्यांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा प्रस्थापित करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

याशिवाय, या प्रकरणाविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी-युवकांवर झालेल्या कथित लाठीमाराचा निषेध व्यक्त करण्यात आला असून, अशा घटनांची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच जंतर-मंतर, दिल्ली येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनास विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने पाठिंबा दिला असल्याचेही यावेळी सांगितले.

देशातील विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित राहावे, स्पर्धा परीक्षांची विश्वासार्हता अबाधित राहावी आणि शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता व उत्तरदायित्व वाढावे, या उद्देशाने हे निवेदन सादर करण्यात आल्याचे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने स्पष्ट केले.

यावेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय, जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular