Sunday, August 2, 2026
HomeBudgetमहाराष्ट्राला गतीने पुढे नेणारा सर्वसमावेशी अर्थसंकल्प

महाराष्ट्राला गतीने पुढे नेणारा सर्वसमावेशी अर्थसंकल्प

A comprehensive budget that will take Maharashtra forward at a fast pace

चंद्रपूर :- विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी राज्याचे लोकप्रिय व विकासाची दृष्टी असलेले मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadanvis यांनी महाराष्ट्र राज्याचा सन 2026-27 या वर्शासाठीचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर केला असून तो सर्वसमावेशी व राज्याच्या सर्वंकष विकास साधणारा व विकसित महाराष्ट्राची संकल्पना साकार करणारा अर्थसंकल्प असल्याचे मत पुर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर Hansraj Ahir यांनी व्यक्त केले आहे.

            राज्याची प्रगती, शाश्वत विकास, सर्वांना न्याय व लोकाभिमुख सुशासन ही या अर्थसंकल्पाचे प्रमुख चार स्तंभ असून शेती, लघु उद्योग, शिक्षण, आरोग्य, रोजगार निर्मिती, पायाभुत सुविधा तसेच संत व महापुरूषांच्या आदर्श वारस्याचे जतन, संवर्धन करून त्यांच्या विचारांची पेरणी करण्यास भरीव आर्थिक तरतुद करण्यात आलेला हा महत्वाकांक्षी अर्थसंकल्प असून या अर्थसंकल्पातून महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेने झेप घेईल असा विश्वास व्यक्त केला.

  शेतकरीशेतमजूरमहिलागौ-पालककुकूटपालकमच्छिमार व अन्य घटकांना दृष्टीपथात ठेवून न्याय दिला आहे. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीकापसाचे भावपिकविमा आणि पंतप्रधान योजनांच्या अनुषंगाने अर्थसंकल्पात भरीव तरतुद करण्यात आली असून मुख्यमंत्र्यांनी विकसित भारताच्या स्वप्नपुर्तीसाठी उचललेले महत्वपुर्ण पाऊल असून हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या प्रगतीचा रोडमॅप ठरेल अशी प्रतिक्रीया हंसराज अहीर यांनी या अर्थसंकल्पावर व्यक्त केली आहे.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular